Anil Kapoor as Aurangzeb: अनिल कपूर यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. सध्या त्याचा 'एनिमल' या चित्रपटातील लुक हा फारच आकर्षक आहे. रणबीर कपूरच्या वडिलांची या चित्रपटातून भुमिका करणार आहेत. अनिल कपूर यांचा रूबाब आजही तसाच आहे अगदी 80 तल्या चॉकलेट हिरोसारखा. अद्यापही ते तितकेच चिकणे आणि हॅण्डसम दिसतात. आता सुत्रांनुसार असं कळतं आहे की अनिल कपूर हे लवकरच औंरगजेबच्या भुमिकेतून दिसणार आहेत. त्यामुळे सध्या त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सोबतच हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असेल. यावेळी शंभूराजांची भुमिका विकी कौशल करणार असून यसूबाईंची भुमिका रश्मिका मंदाना करणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या ऐतिहासिक चित्रपटांचे पेव बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटसृष्टीतही फुटले आहे असं पाहायला मिळते आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक ऐतिहासिक चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली होती. अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती. 'तान्हाजी', 'पानिपत' असे चित्रपट हे बॉक्स ऑफिस चांगलाच धुमाकूळ घालताना दिसले. आता या नव्या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली आहे. ईटाईम्सच्या रिपोर्टनुसार, लक्ष्मण उतेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. लक्ष्मण उतेकर यांनी 2020 साली आलेल्या 'मिमी' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हा चित्रपटही फार गाजला. सोबत 'लुकाछुपी' या चित्रपटाचेही त्यांनी दिग्दर्शन केले आहे. सध्या त्यांच्या या नव्या चित्रपटाचीही जोरात चर्चा ही रंगलेली आहे. 


हेही वाचा : Optical Illusion: माणसांच्या गर्दीत लपलाय एक प्राणी... 10 सेकंदात शोधून दाखवाल?


या ऑक्टोबरमध्ये या चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात होणार आहे. त्यामुळे आता या चित्रपटाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे. या चित्रपटाची अजून कोणाकडूनही अधिकृत घोषणा केलेली नाही. छत्रपती संभाजी महाराज यांचे कर्तृत्व आपल्या देशासाठी कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. तेव्हा त्यांच्यावर येणारा चित्रपटही नक्कीच खास असेल याची खात्री आहे आणि तो पाहण्यासाठीही प्रेक्षक गर्दी करतील. 


सध्या चर्चा आहे ती म्हणजे अनिल कपूर यांच्या एनिमल या चित्रपटाची. यावेळी हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.