मुंबई : बॉलवूड अभिनेत्री कंगना रानौत ही कायमच काही कारणांमुळे चर्चेचा विषय ठरते. पण, यावेळी मात्र ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. ही चर्चा आहे खुद्द कंगनाच्या लग्नाची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

(Kangana Ranaut) कंगनाच्या प्रेमात एक अभिनेता म्हणे इतका वेडा झाला आहे की, पत्नीलाही सोडायची तयारी त्यानं दाखवली आहे. 


कंगनाच्या प्रेमाचं वेड लागलेला हा अभिनेता त्याच्या चिरतारुण्यासाठी ओळखला जातो. हे नाव ऐकून तुम्हाला काहीसा धक्का बसेल. 


जिथं अनेक Female Fans या अभिनेत्याच्या प्रेमात आहेत तिथेच हा अभिनेता म्हणे कंगनावर भाळला आहे. त्याचं नाव आहे, अनिल कपूर. 


'कॉफी विथ करण' या कार्यक्रमामध्ये, अशी कोण अभिनेत्री आहे जिच्यासाठी तुम्ही पत्नीलाही सोडाल असा प्रश्न अनिल कपूर यांना विचारण्यात आला होता.


कंगनाकडे इशारा करत या प्रश्नाचं उत्तर म्हणून मग त्यांनी तिचंच नाव घेतलं. या सर्व प्रकरणामध्य़े कंगना मात्र अद्यापही व्यक्त झालेली नाही. 


दरम्यान, कंगना सध्या खासगी आयुष्यापेक्षा तिच्या कामावरच जास्त लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे. 


येत्या काही दिवसांमध्ये ती, 'धाकड़' आणि 'तेजस' या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.