`अनिल कपूर यांचा आवाज, फोटो चोरण्याचा प्रयत्न केलात तर...` उच्च न्यायलायाचा मोठा निर्णय
Anil Kapoor : आता जर का तुम्ही अनिल कपूर यांचा फोटो, आवाज आणि संवाद त्यांच्या परवानगीशिवाय वापरलात तर त्याचा तुम्हाला फार मोठा फटका होणार आहे. नक्की अनिल कपूर यांच्याबाबतीत हा निर्णय काय आहे हे आपण या लेखातून जाणून घेऊया.
Anil Kapoor : सध्या टेक्नॉलोजीचं जग वाढतं जातं आहे. त्यातून ही टेक्नॉलोजी जशी आपल्यासाठी फार फायदेशीर आहे त्याचप्रमाणे या तंत्रज्ञानाचा आपल्याला दिवसेंदिवस धोकाही वाढताना दिसतो आहे. त्यातून जर का पाहिलं तर आता आर्टिफिशियल इंटॅलिजन्सचं वेडही फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या आपण पाहतो की एआय फोटोज हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे अशा फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसते. त्यातून अशा फोटोंतून कायम खोटेपणा दाखवला जातो आणि सोबतच त्यातून काहीतरी आभासी गोष्टीही बाहेर पडण्याची शक्यता असते. कधी कधी याद्वारे फेक न्यूज आणि फेक फोटोंनासुद्धा चालना मिळू शकते. त्यामुळे खऱ्या कलाकारावरही यामुळे विघ्न येऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया की यावेळी अनिल कपूर यांच्या बाबतीत काय घडलंय?
सध्या सोशल मीडियावर अनिल कपूर यांची जोरात चर्चा रंगलेली आहे. गेली 40 हून अधिक वर्षे अनिल कपूर ही बॉलिवूडवर अधिराज्य करताना दिसत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर केवळ त्यांचीच चर्चा रगंलेली असते. त्यांचे डायलॉग आणि त्यांचे चित्रपट, त्यांची स्टाईल ही घराघरात पोहचलेली आहे. त्यांची मिमिक्री करणारेही फार लोकं आहेत. सोबतच त्यांचे स्टाईल चोरणारेही खूप आहेत. त्यामुळे त्यांची सतत चर्चा रंगलेली असते. यंदा त्यांच्या या स्वत्वच्या ओळखीवर आता सुप्रिम कोर्टानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे. जर का कोणी त्यांच्या चित्रपटातील संवाद, डायलॉग, किंवा त्यांचा फोटो वापरण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा दिल्ली उच्च न्यायालयानं दिला आहे.
हेही वाचा : 'मुक्ताच्या प्रेमात पडावं असं...' प्रसिद्ध गीतकार-लेखकाच्या पोस्टनं वेधलं लक्ष
त्यांचं न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंह यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली आहे. यावेळी या सुनावणीत सांगण्यात आले की सोशल मीडियावर आणि वेबसाईट्स अनिल कपूर यांचं नाव, त्यांचं टोपण नाव AK, त्यांचा आवाज, फोटो आणि 'लखन', 'मिस्टर इंडिया', 'नायक' अशी पात्रं आणि 'झक्कास' या शब्दाचा वापर करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे या निर्णयानुसार कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला अनिल कपूर यांचा आवाज किंवा संवाद वापरायचा असेल तर त्यांना आधी अनिल कपूर यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. तुम्हाला माहितीच आहे की अमिताभ बच्चन यांनीही आपला कोणताही डायलॉग, फोटो आणि आवाज वापरण्यावर परवानगीशिवाय बंदी घालण्यात आली होती.
अनिल कपूर यांच्या आवाजाचा, फोटोचा ओटीटी प्लॅटफॉर्मवर गैरवापर होत असल्याचे निरीक्षणास आले होते. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. आता त्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश मिळाले आहेत.