मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान दस का दम या रियालिटी शो मधून छोट्या पडद्यावर येत आहे. या शोच्या नव्य सिजनचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होत असून प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शो मध्ये अनिल कपूरने फन्ने खान सिनेमाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली. अनिल कपूर यांनी जेव्हा ऐश्वर्या राय बच्चनचं नाव घेतलं तेव्हा मात्र सलमानचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. तो क्षण प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. अनिल कपूर ऐश्वर्याचं नाव घेताच प्रेक्षकही जोरात ओरडू लागले. आणि सलमानच्या गाली हसू फुटले. 


तुम्हीच पाहा हे व्हिडिओज...




ऐश्वर्या-सलमानचं प्रेम आणि ब्रेकअप सर्वांनाच ठाऊक आहे. एकेकाही प्रेमात असलेले हे दोघे आता मात्र एकमेकांना टाळताना दिसतात.