मुंबई: 'वन टू का फोर, फोर टू का वन मेरा नाम हैं लखन' 'राम लखन' सिनेमाला 30 वर्षे पूर्ण झाले. याच पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये अभिनेता अनिल कपूर आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित 'माई नेम इज़ लखन' या गाण्यावर एकत्र थिरकताना दिसत आहेत. अनिल कपूरने ट्विटरवर पोस्ट करत 'माय नेम इज़ लखन' गाण्याला 30 वर्षे पूर्ण झाले आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आजही लखन चाहत्यांचे मनोरंजन करतो. आज सिनेमाचे 30 वर्षे मी आणि माधुरी दीक्षित एकत्रीत साजरा करत आहोत ही खूप आनंदाची गोष्ट आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनमात अनिल कपूरने मुख्य भूमिका पार पाडली होती. त्याप्रमाणे माधुरीही मुख्य भूमिकेत झऴकली होती. माधुरीने सिनेमात राधा ही भूमिका साकारली तर तिच्या वडीलांच्या भूमिकेत अनुपम खेर होते. सिमेनात जॅकी श्रॉफ अनिल कपूरच्या भवाच्या रुपात दिसला. 'माय नेम इज़ लखन' या गाण्याला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. 


'राम लखन' या सिनेमाचे दिग्दर्शन आणि निर्माती सुभाष घाई यांनी केली होती. 'राम लखन' सिनेमा व्यतिरिक्त अनिल आणि माधुरी ही जोडीने अनेक सिनेमांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप कायम ठेवली. 90 व्या शतकात माधुरीने अनेक दमदार सिनेमे केले.परिंदा, लज्जा, राम लखन, बेटा, धारावी असे अनेक सिनेमे तिचे गाजले.