Animal Movie: रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला अ‍ॅनिमल सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. टीझर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. हा सिनेमा अनेक विक्रम मोडेल असा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता. आता चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्या गर्दीचे नवनवे आकडे समोर येत आहेत. प्रेक्षकांनी सिनेमाला डोक्यावर उचलून धरले आहे. पण एका गोष्टीने मात्र प्रेक्षकांची घोर निराशा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणबीर कपूरमुळे अ‍ॅनिमल जितका चर्चेत होता. तितकीच हाईप बॉबी देओलचीही करण्यात आली ​​होती.  टीझर रिलीज झाल्यापासून बॉबी देओलच्या व्यक्तिरेखेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. बॉबी देओलचा एक मोठा चाहतावर्ग आहे. जो खास बॉबीसाठी सिनेमा पाहायला गेला होता. मात्र या प्रेक्षकवर्गाची घोर निराशा झाली. 


टीझरमध्ये बॉबी देओलला दाखवून अ‍ॅनिमलचे प्रमोशन करण्यात आले होते. परंतु रिलीजनंतर हा अभिनेता थोड्या काळासाठीच दिसला,पण सिनेमात बॉबी देओलच्या वाट्याला फार मोजकीच भूमिका आली आहे. हे पाहून त्याचे फॅन्स निराश झाले आहेत. सोशल मीडियात यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान आता खुज्ज बॉबी देओलनेही अॅनिमलमध्ये कमी स्क्रीन टाइम दिल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. 


मला स्वतःला अ‍ॅनिमल सारख्या चित्रपटात दीर्घ भूमिका साकारण्याचीइच्छा होती, पण कमी कालावधीची भूमिका असल्याची जाणीव आधीपासूनच होती, असे तो सांगतो. 


अ‍ॅनिमलचे कलाकार काय म्हणाले?


अ‍ॅनिमलमध्ये बॉबी देओलने खलनायक अबरार हकची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील बॉबीचा निगेटीव्ह रोल प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणत आहे. 'ही कॅरेक्टरची लांबी नाही, तर त्या कॅरेक्टरचा प्रकार आहे ज्यामध्ये खूप पॉवर आहे. मला जास्त सीन्स हवे होते पण जेव्हा मी चित्रपट साईन केला तेव्हापासून मला माझी भूमिका काय आहे हे माहित होते, असे बॉबी म्हणाला. डीएनएने यासंदर्भाती वृत्त दिले आहे. 


प्रतिसाद पाहून वाटले आश्चर्य 


जेव्हा संदीप रेड्डी वंगा यांनी मला ही भूमिका ऑफर केली, तेव्हा मी देवाचे आभार मानले होते. मला फक्त 15 दिवस काम करायचे होते आणि मी संपूर्ण चित्रपटात असणार नव्हतो. मला खात्री होती, लोक माझ्याकडे लक्ष देतील पण मला इतके प्रेम मिळेल याची मला कल्पना नव्हती. हे आश्चर्यकारक 


स्पिन ऑफवर 


बॉबी देओल पुढे म्हणाला की, अ‍ॅनिमलमधील त्याची भूमिका मागणीनुसार वाढवता आली असती. लोकांना हे पात्र इतके आवडले आहे की त्यात एक स्पिन-ऑफ असावा. लोकांना तुमचे काम आवडले आहे आणि तुम्हाला आणखी पाहायचे आहे हे प्रोत्साहन देणारे आहे,असे त्याने सांगितले. मला ते पात्र साकारल्याचा आनंद झाल्याचेही त्याने सांगितले.