मुंबई : अभिनेता रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवसापासून  बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने कलेक्शनचे अनेक विक्रम मोडले आहेत. या सिनेमाने विकेंडला मोठा इतिहास रचला आहे. हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर या सिनेमाच्या दुसऱ्या रविवारी अॅनिमलने आमिरच्या दंगल सिनेमाला मागे टाकलं आहे. या सिनेमाच्या ११ व्या दिवशी या सिनेमाने किती गल्ला जमवला आहे हे आपण आजच्या या बातमीत जाणून घेणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अ‍ॅनिमल'  रिलीजच्या ११ व्या दिवशी केली इतकी कमाई
रणबीर कपूरच्या अॅनिमलची सध्या जोरदार चर्चा आहे. हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. आणि हा सिनेमा सध्यातरी थांबण्याचं नाव घेत नाहीय या सिनेमाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर, 'अ‍ॅनिमल'ने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 337.58 करोड इतकं कलेक्शन केलं आहे. याचबरोबर दुसऱ्या शुक्रवारी या सिनेमाने 22.95 करोड रुपयांची कमाई केली आहे. तर अॅनिमवच्या दुसऱ्या शनिवारी 34.74 करोड रुपयांचं कलेक्शन केलं आहे. तर दुसऱ्या रविवारी सिनेमाने 36 करोड इतकं कलेक्शन केलं आहे.  याचबरोबर या सिनेमाने ११ व्या दिवशी 443.27 करोड इतकी कमाई केली आहे.


'अ‍ॅनिमल'ची बॉक्सऑफिसवर परफॉर्मन्स हैराण करणारा आहे. सिनेमाच्या रिलीजच्या ११ व्या दिवशी  440 करोडपेक्षा जास्त कमाई केली आहे आणि हा आकडा लवकरच 450 करोड पार करण्याच्या मार्गावर आहे. या सिनेमाच्या वर्ल्डवाइड कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, या सिनेमाने १० दिवसांत जगभरात 717.46 करोड इतकी कमाई केली आहे.  11व्या दिवशी 'अ‍ॅनिमल' जगभरातून 730 कोटींहून अधिक कमाई करेल अशी अपेक्षा आहे.


या सिनेमात रणबीर कपूरसोबत रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर आणि तृप्ति डिमरी महत्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केलं आहे. चित्रपट रिलीज होऊन सहा दिवस झाल्यानंतरही चित्रपटगृबाहेर प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळत आहे. चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहण्याची संधी सोडण्याची प्रेक्षकांची इच्छा आहे.रणबीर कपूरची मुख्य भूमिका असणारा 'अ‍ॅनिमल' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.