Animal Movie Jamal Kudu Song: दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाचा 'अ‍ॅनिमल' चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. या चित्रपटातील गाणीही तुफान व्हायरल झाली आहेत. या चित्रपटातील 'जमाल कुडू' गाण्यातील हावभाव आणि डान्ससाठी अभिनेता बॉबी देओलचं कौतुक होत आहे. 'जमाल कुडू' या इराणी गाण्यावर बॉबी देओल थिरकताना दिसत आहे. या इराणी गाण्यावर डान्स करतच चित्रपटामध्ये बॉबीची एन्ट्री होते. या एन्ट्रीची ही तुफान चर्चा आहे. मात्र सोशल मीडियावर या गाण्यासंदर्भातील वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच मराठी चित्रपटसृष्टीमधील दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.


काय आहे लक्ष्याच्या व्हिडीओमध्ये?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल झालेल्या हा व्हिडीओ का जुन्या गाण्यातील आहे. या गाण्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच लक्ष्या नाचताना दिसत आहे. मात्र 'जमाल कुडू' गाण्यामध्ये ज्याप्रमाणे बॉबी देओल डोक्यावर मद्याचं ग्लास ठेऊन डान्स करतो तशाच प्रकारे लक्ष्मीकांत बेर्डे गाण्यात नाचताना दिसत आहे. दोन्ही हातात दोन मद्याचे ग्लास आणि डोक्यावर बॅलेन्स केलेला ग्लास अशी तिहेरी कसरत करत लक्ष्या डान्स करतोय. आपल्या हातातील ग्लास पार्टीसाठी आलेल्या पाहुण्यांना देताना दुसरीकडे डोक्यावरील ग्लासही लक्ष्याने बॅलेन्स केल्याचं दिसत आहे. 


1989 मध्येच केलाय लक्ष्या मामाने हा डान्स


व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर, 'लक्ष्या मामांनी 1989 मध्येच हे केलं होतं,' अशी ओळ लिहिलेली आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ प्रचंड पसंत पडला असून त्याला लाखोंच्या संख्येनं व्ह्यूज मिळाले आहेत. 3 दिवसांमध्ये व्हिडीओला 1.18 लाखांहून अधिक लाईक्स मिळालेत. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...



चाहत्यांच्या मजेदार कमेंट्स


लक्ष्याच्या या जुन्या व्हिडीओचा 'जमाल कुडू' गाण्याशी संबंध लावत अनेकांनी हिंदीने पुन्हा एकदा मराठीमधून संकल्पना चोरल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी नोंदवल्यात. "आपल्या मराठी चित्रपटातील सीन 'अ‍ॅनिमल'मध्ये चोरला आहे," असं एकाने म्हटलं आहे. तर अन्य एकाने, "बॉलिवूड वाले नेहमीच कॉपी करतात मराठी सिनेमा आणि नवीन केलं म्हणून जगाला दाखवतात," असं अन्य एकाने म्हटलं आहे. 'बॉबी देओल लेट झाला,' अशी प्रतिक्रिया अन्य एकाने नोंदवलीय तर बऱ्याच जणांनी 'बॉबीने लक्ष्मीकांत बेर्डेंची कॉपी केली' असं म्हटलं आहे. बऱ्याच चाहत्यांनी हा व्हिडीओ पाहून लक्ष्या मामांची आठवण झाल्याचं म्हटलं आहे.