Animal Box Office : नवव्या दिवशी अॅनिमल सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ, विकीच्या सिनेमाला जबरदस्त टक्कर
Animal Vs Sam Bahadur : बॉकिस ऑफिसवर रणबीरचा Animal हा सिनेमा विकी कौशलच्या Sam Bahadur सिनेमाला चांगलीच टक्कर देत आहे.
रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटाचा धमाका सुरूच आहे आणि आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा खळबळ माजवणार आहे. संदीप रेड्डी वंगा यांच्या 'अॅनिमल' या चित्रपटाने 9 दिवसांत बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. रणबीर कपूर, बॉबी देओल स्टारर या चित्रपटाने बॉलिवूड चित्रपटांच्या जगात इतिहास रचला आहे. 'अर्जुन रेड्डी' आणि 'कबीर सिंह' नंतर संदीप रेड्डी वंगा यांचा तिसरा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटासोबतच प्रदर्शित झालेला विकी कौशलचा 'सॅम बहादूर' हा चित्रपट 'अॅनिमल'मुळे मागे पडला आहे. भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारे भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या कथेवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात कमी यशस्वी ठरला. 9 दिवसात या दोन चित्रपटांची अवस्था कशी होती ते जाणून घेऊया.
'अॅनिमल'ने पहिल्या दिवशी 63.8 कोटींची कमाई केली, जो आतापर्यंतचा दुसरा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट आहे. 'जवान' नंतर 'अॅनिमल'ने सर्वाधिक कमाई केली आणि मागील सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, अॅनिमलने नवव्या दिवशी 37.00 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशाप्रकारे, एकूणच चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 400 कोटींच्या जवळ पोहोचला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 398.53 कोटींची कमाई केली आहे.
जगभरात 'अॅनिमल'ने आतापर्यंत 630 कोटींहून अधिक कमाई
जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने आतापर्यंत 630 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. याने 8 दिवसात 600 कोटींचा टप्पा ओलांडला होता. या चित्रपटाने 8 दिवसात भारतात 429.20 कोटी रुपयांचे कमाई केली आहे. हा चित्रपट देशभरातील सुमारे ४००० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. सुमारे 100 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट सुमारे 3 तास 21 मिनिटांच्या रनटाइममुळे चर्चेत राहिला आहे.