Animal Bad Reaction : रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' हा सिनेमा शुक्रवारी, 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि तो चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही कारणांमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर काही प्रेक्षक चित्रपटांच कौतुक केलं आहे तर काहींनी टिका देखील केली आहे. आता काही नवीन दृश्यांची ऑनलाइन चर्चा होत आहे आणि ती म्हणजे 'पॅड'मधील दृश्य. सिनेमात रणबीरची पत्नी रश्मिका मंदानाला तिच्या मासिक पाळीबद्दल तक्रार कशी करते याबद्दल ओरडताना दिसतो, परंतु तो एडल्ट डायपर घालतो आणि युरिन बॅग आणि कॅथेटर घेऊन फिरत असतो.


रणबीरचा डायलॉग 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणबीर कपूर म्हणतो की, महिन्यातून 4 वेळा पॅड बदलताना तुझे इतके नाटक असतात. मी दररोज 50 करतोय. रणबीर पीरियड्स आणि आपल्या सर्जरीची तुलना करत असल्याचं दिसत आहे. 


रणबीरच्या डायलॉगला भडकले प्रेक्षक 



रणबीरच्या या डायलॉगवरून यूझर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही प्रेक्षकांना हे डायलॉग अजिबातच आवडले नाही. एकाने लिहिले, 'मला हे जाणून घ्यायचे आहे की वंगा कोणत्या ब्रँडचा गांजा घेतो. हे 4 पॅड 11-59 वर्षे प्रत्येक महिन्याचे 5 दिवस घ्यावे लागतात. काही मूलभूत ज्ञान असावे. तुम्ही तुमच्या कुटुंबातील स्त्रियांशी कसे वागता हे देव जाणो.



लोकांनी ऐकवलं खरं-खोटं



एकाने लिहिले, 'तुम्ही तिचे पीरियड्स डायलॉगमध्ये का आणले? तिला मासिक पाळी येते आणि ती मरत नाही, पण उघड्या जखमेवर 50 पॅड बदलल्याने तो मरत आहे!' एका युझरने सांगितले की, '11-59 वर्षांच्या आयुष्यात दर महिन्याला 5 दिवस येतो.'