Bobby Deol Son Photo : रणबीर कपूर आणि बॉबी देओलची प्रमुख भूमिका असलेला 'ॲनिमल' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली होती. हा चित्रपट पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक हे गर्दी करताना दिसत आहेत. या चित्रपटामुळेच बॉबी देओल हा पुन्हा प्रसिद्धीझोतात आला. आता बॉबी देओलने त्याचा मुलगा आर्यमनसोबतचा फोटो पोस्ट केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉबी देओल हा इन्स्टाग्रामवर सक्रीय असतो. 'ॲनिमल' चित्रपटानंतर बॉबी हा कुटुंबाबरोबर वेळ घालवताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी बॉबीने त्याचे वडील धर्मेंद्र यांच्याबरोबरचा फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर आता बॉबीने त्याच्या लेकाबरोबरचा खास फोटो पोस्ट केला आहे. 


बॉबी देओलने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर त्याचा मुलगा आर्यमनबरोबरचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत बॉबी देओल हा निळ्या रंगाचे ब्लेझर, पांढरे शर्ट परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे त्याचा मुलगा आर्यमनने काळ्या रंगाचे ब्लेझर परिधान केले आहे. यात ते दोघेही फारच छान दिसत आहेत. 



बॉबीने हा फोटो पोस्ट केल्यावर अनेक कलाकारांनी यावर कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री प्रिती झिंटा हिने या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट केला आहे. तर अभिनेता सनी देओलने यावर हार्ट इमोजी शेअर करत कमेंट केली आहे. 


बॉबी आणि आर्यमनच्या या फोटोवर अनेक नेटकरीही कमेंट करताना दिसत आहेत. "बाप-लेकाची सुंदर जोडी", अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने "हा तर भाऊ वाटतोय!" असे म्हटले आहे. तसेच एकाने "बॉलिवूडचा आगामी काळातील सुपरस्टार" असे म्हटले आहे.



दरम्यान बॉबी देओल हा सध्या 'ॲनिमल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात बॉबीने खलनायक असलेल्या अबरार हकचे पात्र साकारले होते. या चित्रपटातील त्याच्या लूक आणि उत्कृष्ट अभिनयाचे अनेकजण कौतुक करत आहेत. या चित्रपटाने भारतात 500 कोटींहून अधिकची कमाई केली होती. तर जगभरात या चित्रपटाने 800 कोटींचा गल्ला जमावला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले होते. यात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते.