Animal Trailer Released : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या सिनेमाची सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे रणबीरच्या एनिमल सिनेमाची. गेले अनेक दिवस प्रेक्षक या सिनेमाच्या ट्रेलरची वाट पाहत होते. मात्र आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आहे. नुकताच संदीप रेड्डी वांगाने एनिमल सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला आहे. हा ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं आहे. एनिमल हा सिनेमा 2023 मधील मोस्ट वेटेड सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमात भली मोठी स्टार कास्ट आहे. मुख्य म्हणजे रश्मिका मंदाना आणि रणबीर पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करत आहेत. या सिनेमात रणबीर आणि रश्मिका मुख्य भूमिकेत आहेत. 
 
तगडी स्टार कास्ट आणि जबरदस्त दिग्दर्शनामुळे हा सिनेमा आधीपासूनच खूप चर्चेत आहे. आता या सिनेमाच्या ट्रेलरचा सगळीकडे बोलबाला आहे.  या सिनेमातील प्रत्येक सीन तुमचा श्वास रोखून धरायला भाग पाडेल. ट्रेलरमध्ये रणबीर कपूर दमदार एक्शन करायला पाहायला मिळत आहे. त्याच्या रावडी लूकने चाहते त्याच्या पुन्हा एकदा प्रेमात पडतील येवढं नक्की. हा सिनेमा वडिल मुलाच्या नात्याभोवती फिरतो. अनिल कपूर रणबीर कपूरच्या वडिलांच्या भूमिकेत दिसत आहे. या सिनेमात अर्जून सिंह म्हणजेच रणबीर त्याच्या वडिलांवर खूप प्रेम करत असतो. मात्र त्याचे वडिल बलबीर सिंह नेमहीच रागिष्ट स्वभावाचे दिसत आहेत. मात्र या सगळ्याचा मुलावर काहीच फरक पडत नाही. त्याच्यासाठी त्याचे वडिल म्हणजे सुपर हिरो असतात. एवढंच नव्हेतर त्याचं त्याच्या वडिलांवर इतकं प्रेम असतं की, त्याचं त्याच्या पत्नीवर म्हणजेच गितांजलीपासून दूर राहू लागतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर त्याला बातमी मिळते की, त्याच्या वडिलांवर कोणीतरी गोळी चालवली आहे. मग तो कोणताही मागचा पुढचा विचार न करता तिथून निघून त्याच्या वडिलांकडे येतो. यानंतर तो शप्पथ घेतो की, ज्याने कोणी माझ्या वडिलांवर गोळी चालवलीये त्याला मी सोडणार नाही आणि मग तो जनावरांसारखा होतो. त्याचा सगळं ध्येय त्याच्याच अवती भोवती फिरु लागतं. या सिनेमात बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. जरी तो या संपुर्ण ट्रेलरमध्ये फार कमी वेळ दिसत असला तरी त्याची रणबीर पेक्षा चर्चा होताना दिसत आहे.



संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित एनिमल हा सिनेमा १ डिसेंबरला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.  हिंदीसोबतच हा चित्रपट तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील मुख्य आकर्षण म्हणजे सिनेमातील भली मोठी स्टार कास्ट या चित्रपटात रणबीर कपूरसोबत बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदान्ना हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.