Aniruddhacharya Maharaj In Bigg Boss 18 : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा सतत चर्चेत राहणारा 'बिग बॉस 18' हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सगळ्यात अशी चर्चा रंगली आहे की आध्यात्मिक बाबा अनिरुद्धाचार्य स्पर्धक म्हणून येणार आहे. आता तो शोमध्ये दिसणार की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. आध्यात्मिक बाबा अनिरुद्धाचार्यचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. आता अनिरुद्धाचार्य या शोमध्ये दिसणार की नाही हे बघण्यासारखं ठरणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्ट्सनुसार, 'बिग बॉस 18' च्या निर्मात्यांनी आध्यात्मिक बाबा अनिरुद्धाचार्यशी शोसाठी संपर्क साधला होता. धर्मगुरुचे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आणि त्यात त्याच्या शिक्षांची संख्या देखील जास्त आहे. त्याचं व्यक्तीमत्त्व आणि सेंस ऑफ ह्यूमरनं तो सगळ्यांचे लक्ष वेधताना दिसतो. निर्माते त्याला शोमध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आध्यात्मिक बाबा अनिरुद्धाचार्यनं त्यांच्या ऑफरला नकार दिल्याचे म्हटले जाते. शोमध्ये सतत होणारे वाद आणि भांडण हे पाहता त्यात सहभागी न होण्यास नकार दिला आहे. 


मात्र, आध्यात्मिक बाबा अनिरुद्धाचार्य यांनी आधी देखील टिव्ही शोमध्ये हजेरी लावली होती. तो 'लाफ्टर शेफ एंटरटेनमेंट इंडिया' मध्ये पाहुणा म्हणून हजेरी लावली होती. त्यावेळी त्यानं मस्करी आणि सगळ्यांचे खूप मनोरंजन देखील केले. त्यावेळी त्यानं प्रेक्षक आणि सेलिब्रिटींना त्याच्या सेन्स ऑफ ह्युमरनं सगळ्यांचे लक्ष वेधले. त्यामुळे त्याला आता बिग बॉसमध्ये पाहता येणार अशी शक्यता पाहता त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. 


लक्षवेधी गोष्ट ही आहे की याआधी 'बिग बॉस 10' मध्ये स्वामी ओम नावाच्या आध्यात्मिक बाबानं हजेरी लावली होती. त्याच्या वादग्रस्त स्वभावामुळे तो चर्चेत होता. स्वामी ओमनं शो दरम्यान अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आणि सलमान खानकडून त्यासगळ्यावर टीकास्त्रव पाहिला. त्याच्या वक्तव्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले होते. 


दरम्यान, सध्या 'बिग बॉस 18' मध्ये सहभागी होण्यासाठी इतर काही सेलिब्रिटींची नावं समोर येत आहेत. कनिका मान, शोएब इब्राहिम, सोमी खान, दलजीत कौर, डॉली चायवाला आणि फैजल शेख उर्फ फैजू यांचे नावं समोर आली आहेत. शोची सुरुवात ही 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. पण त्याची काही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. 


तर्कविसंगत दावे


त्याशिवाय, त्याचा सत्तरमध्ये काय मिळवल्यानं सतरा होतात? नोकरी मिळत नसल्यानं सुंदर पिच्चई अमेरिक गेले आणि गूगलचे सीईओ झाले. अ‍ॅप्लचा लोगो कसा ठरवण्यात आला याविषयी देखील त्यानं त्याचं म्हणण मांडलं होतं. त्यानं म्हटलं की भारतातील एका आध्यात्मिक गुरुनं सफरचंदला एका बाजूनं खाल्लंलं आणि स्टीव्ह जॉब्सला दिलं अशा प्रकारे अ‍ॅप्लचा लोगो ठरला. असे तर्कविसंगत दावे करत असल्यानं या बाबांचे व्हिडीओ आध्यात्मिक कारणापेक्षा मस्करीचा विषय म्हणून सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.