मुंबई : अनिता हसनंदानी  (Anita Hassanandani)ने मोठा खुलासा केला आहे. ती टीव्ही इंडस्ट्रीत येण्यापूर्वी सुरूवातीच्या काळात ती डिप्रेशनशी झुंज देत होती. सुरूवातीच्या काळात अपयशामुळे ती खूप खलची होती. तेव्हा या काळात एका व्यक्तीची तिला खूप मोठी मदत मिळाली. या व्यक्तीने तिला कठीण प्रसंगातून बाहेर येण्यास मदत केली. 


अनिता हसनंदानी त्या व्यक्तीचे मानले आभार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिता हसनंदानीने निर्माता एकता कपूरचे खूप आभार मानले आहेत. अपयशाच्या काळात डिप्रेशन आलं. यावेळी निर्माता एकता कपूरची अनिताला खूप मोठी साथ मिळाली. अनिताने एकता कपूरच्या 'कभी सौतन कभी सहेली' मालिकेत अभिनय केला. ती या शोमुळे खूप लोकप्रिय झाली. यानंतर अनिता 'कुछ तो है' आणि 'ये है मोहब्बतें'मध्ये दिसली. त्याने 'नागिन 3' मध्येही काम केले होते.



सोमवार, ८ नोव्हेंबर रोजी एकता आणि रोहितसोबतचा सेल्फी शेअर करताना अनिताने लिहिले, 'एकता!!! तू जी महिला सक्षम पात्र तयार केली आहे. तू अगदी तशाच प्रकारे आहेस. तू एक उत्तम मैत्रीण तर आहेसच सोबत पक्का विचार असेलली महिला आहेस. आपल्या दोघांमधील मैत्री इतकी मुरली आहे की, एकमेकांकरता काहीही न सांगता अपेक्षित गोष्ट करू शकतो. 


ती पुढे लिहिते, 'मला ते दिवस आठवतात जेव्हा मी तरूण होती. काम करण्याची इच्छा होती. मात्र अनेक गोष्टींपासून अनभिज्ञ होती. माझ्या सुरुवातीच्या अपयशाचा माझ्यावर वाईट परिणाम झाला, नंतर तू माझ्या आयुष्यात आलीस. तुम्ही मला उदासीनतेशी लढण्यास मदत केली नाही तर मला एक नवीन सुरुवातही दिली. मी तुझ्याकडून शिकलेल्या लाखो गोष्टींपैकी एक म्हणजे कधीही हार मानू नका.


कठीण दिवसांची आठवण करून अनिता म्हणते, 'कठीण दिवसांतही तुझ्यामुळे मला सुरक्षित वाटलं. जगाच्या प्रत्येक भावनेत तू आहेस, माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग्य आहे. तू माझ्या आयुष्यातील नियती आहेस. तू माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या नशिबाचा भाग आहेस.' अशा शब्दात अनिता हसनंदानीने एकताचं कौतुक केलं आहे.