मुंबई : कंगना रणौतचा गेम शो 'लॉकअप' सध्या खूप चर्चेत आहे. या शोमध्ये सोशल मीडियावरील अनेक प्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाल्या आहेत. त्यापैकी एक आहे कंटेंट क्रिएटर अंजली अरोरा, जी अलीकडेच 'कच्छा बदाम' या गाण्यावर बनवलेल्या तिच्या डान्स व्हिडिओमुळे चर्चेत आली होती.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर फॉलोवर्सकडून लाइक्सचा वर्षावर मिळवणारी अंजली देखील इन्स्टाग्रामवर कायम ऍक्टिव असते. फॅन फॉलोअर्सच्या बाबतीत कंगना रणौतलाही आव्हान देताना दिसत आहे.


कंगना राणौतचे इन्स्टाग्रामवर 7.9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत, तर अंजली अरोराचे 11 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर अंजलीचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा ट्रेंडमध्ये असतात आणि चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात.


सध्या अंजली कंगनाच्या 'लॉकअप' शोमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.