स्वत:च्या लग्नाच्या घाईघडबडीत विकीला सोडून अंकिताची या व्यक्तीसोबत कानात `कुजबूज`
अभिनेत्री अंकिता लोखंडेने लग्नाआधी संगीत सोहळ्याचं आयोजन केलं होतं.
मुंबई : टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेने लग्नाआधी संगीत सोहळ्याचं आयोजन केलं होतं. काल रात्री अंकिता लोखंडे तिचे कुटुंबीय आणि खास मित्र-मैत्रिणींसोबत धमाल मस्ती करताना दिसली. अंकिता लोखंडेच्या या शानदार पार्टीत बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतही पोहोचली होती. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या या पार्टीत कंगना राणौतने धमाकेदार एन्ट्री केली. विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्या संगीत सोहळ्यात कंगना रणौत पोहोचली.
कंगना रणौतने अंकिता लोखंडेला मिठी मारली
कंगना राणौतने अंकिता लोखंडे भेटताच मिठी मारली. यानंतर कंगना राणौतने अंकिता लोखंडेच्या कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली. संधी मिळताच कंगना रणौत आणि अंकिता लोखंडे यांच्यात जोरदार गप्पा रंगल्या. फोटोमध्ये कंगना रणौतने अंकिता लोखंडेचा हात पकडला आहे. कंगना रणौतने अंकिता लोखंडेसोबत पोज दिली. कंगना रणौतने संगीत सेरेमनीमध्ये अंकिता लोखंडेसोबत जबरदस्त पोज दिली. चाहत्यांना या दोघांच्या फोटोवरून नजर हटवता येत नाही.
कंगना रणौतने विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांचं अभिनंदन केलं. कंगना रणौतने अंकिता लोखंडेला तिच्या लग्नाबद्दल खूप गोड शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत. कंगना रणौत आणि विकी कौशल असेच नेहमी आनंदी राहावेत अशी प्रार्थना यावेळी कंगना रणौतने केली. अंकिता लोखंडे आणि कंगना राणौत यांनीही एकत्र डान्स केला. या फोटोमध्ये दोन्ही अभिनेत्री सुंदर दिसत आहेत.
कंगना राणौत विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्या संगीतात सेरेमेनीमध्ये क्वीनच्या लूकमध्ये पोहोचली. कंगना रणौत अंकिता लोखंडेच्या संगीत सोहळ्यात अतिशय सुंदर आउटफिट घालून पोहोचली होती. अंकिता लोखंडेच्या या थीम पार्टीशी कंगना राणौतचे कपडे अगदी मॅच होत होते. कंगना राणौतची ज्वेलरी देखील खूप सुंदर होती.
कंगना राणौतने शेअर केले फोटो
काही वेळापूर्वी कंगना राणौतने अंकिता लोखंडेच्या संगीत सोहळ्यातले सुंदर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.