मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतचा आगामी सिनेमा 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे हीदेखील एक महत्त्वाची भूमिका निभावतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमातून अंकिता बॉलवूड डेब्यू करतेय.  'मणिकर्णिका'मध्ये अंकिता झलकारी बाईच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातला तिचा लूक आता समोर आलाय. 


अंकिता 'झलकारी'च्या भूमिकेत 

या फोटोत महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये अंकिता हिरव्या - लाल रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसतेय. अंकिताचं शूटिंग जवळपास पूर्ण झालंय. हा सिनेमा ३ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. 


'मणिकर्णिका' या सिनेमात रानी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत कंगना रानौत दिसणार आहे. या सिनेमाचं स्क्रिप्ट 'बजरंगी भाईजना' आणि 'बाहुबली'चे स्क्रिप्ट रायटर के व्ही विजेंद्र प्रसाद यांनी लिहिलंय.