Ankita Lokhande Cozy Dance With Naved : 'बिग बॉस 17' संपल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या घरी सेलिब्रेशन सुरु झालं. तिच्या या सेलिब्रेशनमध्ये तिच्या जवळचे मित्र सहभागी झाले होते. यावेळी, बिग बॉस 17 मधील स्पर्धक नावेद सोलनं देखील या पार्टीत हजेरी लावली होती. आता या सगळ्यात अंकिता आणि नावेदचे पार्टीतील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यानंतर अंकिताला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत अंकिता आणि नावेद डान्स करत आहेत. या व्हिडीओत ते कोजी होत असल्याचे पाहायला मिळते. बॅकग्राऊंडमध्ये तुम क्या मिले हे गाणं सुरु असल्याचं ऐकायला मिळत आहे. तर त्या व्हिडीओत अंकिता कधी त्याला मिठी मारते तर कधी त्याला जवळ घेते. नावेदनं तिला गालावर किस केलं. व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झाला.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अंकिताचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी कमेंट करत बोलत आहेत की 'हेच जर विकीनं केलं असतं तर मोठा वाद झाला असता.' एकानं कमेंट केली की 'स्वत: हे सगळं करते आणि पती काही करत नाही, तरी त्याला ओरडतं असते.' एकानं लिहिलं की 'स्वत: केलं तर रास लीला आणि विकीनं केलं तर त्याचं कॅरेक्टर खराब आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'सासूनं आधीच चेतावनी दिली होती की कुटुंबाची अब्रु जाईल असं काही करू नकोस.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'बाहेर आल्यानंतर ऑरीची आत्मा आली वाटतं हिच्यात.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'हेच जर विकीनं केलं असतं तर अंकितानं आतापर्यंत त्याचा जिव घेतला असता.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'विकी मुलींशी बोलूही शकत नाही, तर ही सगळं काही करू शकते.'  


हेही वाचा : 'सालार' च्या यशानंतर प्रभासनं घेतला अभिनयातून ब्रेक! काय आहे कारण?


दरम्यान, अंकिता बिग बॉसची विजेता ठरली नाही. त्यामुळे सगळ्यांना आश्चर्य झाले त्यातही ती रनरप देखील नव्हती. तिला चौथा क्रमांक मिळाला आणि यासगळ्यानं तिच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. अंकिता फिनालेमध्ये खूप नाराज असल्याचे पाहायला मिळते आणि शो संपल्यानंतर तिनं कोणालाही मुलाखत दिली नाही. सरळ घरी गेली. तर मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा आणि अरुणनं मुलाखती दिल्या. अंकिता घरी जात असताना तिच्या चेहऱ्यावर ती नाराज असल्याचे पाहायला मिळत होते.