मुंबई : छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या चांगलीच चर्चेत आहे. एकतर ती कंगना राणावतच्या ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या सिनेमातून मोठ्या पडद्यावर येत आहे. आणि दुसरं म्हणजे तिचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंकिताला डान्सची आवड असून तिने तिची ही डान्सची आवड दुबईत जाऊन पूर्ण केली. बरं हा डान्स तिने एखाद्या अवॉर्ड शोमध्ये नाहीतर चक्क रस्त्यावर डान्स केलाय. अंकिता सध्या दुबईमध्ये आहे. इथे १०वा मसाला अवॉर्ड होणार असून त्यात ती सहभागी होणार आहे. इतकेच काय तर त्यात ती डान्सही करणार आहे. पण त्याआधी मित्रांसोबत दुबईतील बॉलिवूड पार्कमध्ये केलेल्या डान्सची व्हिडिओ चर्चेत आलाय. 



अंकितासोबतच या अवॉर्ड शोसाठी श्रीदेवी, गोविंदा, पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हे सुद्धा दुबईमध्ये आहे. ‘मणिकर्णिका’ या सिनेमात अंकिता तलवारबाजी करताना दिसणार आहे. राणी लक्ष्मीबाईची मैत्रीण झलकारी बाईच्या भूमिकेत ती दिसणार आहे.