मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावरून आपलं मत मांडत आहे. सुशांतला कुटुंबियांना सपोर्ट करणारी अंकिता आता आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. अभिनेत्रीने नुकतेच काही साडीतील फोटो आणि व्हिडिओ आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंकिता लोखंडे या व्हिडिओत 'लुटेरा' सिनेमातील लोकप्रिय ट्रॅक 'हवा के झोंके' गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. अंकिता लोखंडे साडीत अतिशय सुंदर दिसत आहे. तसेच या गाण्यावर तिने उत्तम डान्स केला आहे. 



व्हिडिओ शेअर करताना म्हटलंय की,'साडी डान्स आणि चांगल म्युझिक, काय अद्भुत मेळ आहे.' अंकिताच्या या पोस्टवर चाहत्यांनी खूप मनापासून प्रतिक्रिया दिली आहे. 


अंकिताने सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्याबाबतच्या अनेक आठवणी शेअर केल्या. सुशांतला न्याय मिळावा यासाठी ती प्रयत्नशील राहिली. आता अंकिता आपलं नॉर्मल आयुष्य जगत आहे. चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी प्रयत्नशील आहे.