`स्वत: ला माधुरी समजू नकोस...`, धकधक गर्लच्या लूकमध्ये अंकिता दिसताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Ankita Lokhande : अंकिता लोखंडेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिला पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
Ankita Lokhande : अभिनेत्री अंकिता लोखंडेनं फक्त छोट्या पडद्यावर नाही तर मोठ्या पडद्यावर देखील स्वत: ची जादू केली आहे. पवित्र रिश्तापासून सुरु झालेल्या या प्रवासानंतर आता अंकिता मोठ्या पडद्यावर काम करताना दिसते. अंकिताही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहिल्याचे दिसते. नुकतीच अंकिता 'डांस दीवाने' च्या सेटवर स्पॉट झाली. यावेळी तिच्या लूकनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तिनं माधुरी दीक्षितसारखा लूक केला असून आता त्या दोघांची तुलना होत आहे.
अंकिता लोखंडेचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. डान्स दिवानेच्या सेटवर दिसली. यावेळी अंकितानं 'सैलाब' च्या 'हमको आज कल है' या माधुरी दीक्षितच्या आयकॉनिक गाण्याचा लूक केला आहे. इतकंच नाही तर त्यासोबत तसेच दागिने देखील परिधान केले आहेत. त्यासोबत माधुरीचा संपूर्ण लूक करण्यासाठी तिनं कुरळे केस आणि लाईट मेकअप केला आहे.
अंकिताचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तिचा हा लूक पाहिल्यानंतर त्यावर त्यांची प्रतिक्रिया देण्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी अंकिताला पाहून ती माधुरीची जुळी बहीण दिसत असल्याचं म्हटलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की स्वत: ला माधुरी समजण्याची चूक करु नकोस. दुसरा नेटकरी म्हणाला, माधुरीसारखं कोणी नाही पण अंकिता तू सुंदर दिसतेस. तिसरा नेटकरी म्हणाला की खरं सांगून तर अंकिता देखील सुंदर दिसते. आणखी एक नेटकरी म्हणाला की इंदोरची माधुरी... मी अनेकदा ऐकलं आहे की तिला पाहून लोक तारुण्यातील माधुरी दीक्षित असं म्हणतात. दुसरा नेटकरी म्हणाला, ती हुबेहुबे माधुरी दीक्षित दिसते. मेकअप आर्टिस्टनं काय सुंदर काम केलं आहे.
हेही वाचा : सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी 5 व्या आरोपीला अटक, राजस्थानातून पुरवला होता पैसा
अंकिता लोखंडेच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती नुकतीच रणदीप हुड्डाच्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटात दिसली होती. अंकिताच्या या चित्रपटातील भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली आहे. अंकितानं या चित्रपटात 'यमुनाबाई सावरकर' ही भूमिका साकारली होती.