Ankita Lokhande Pregnant : अंकिता लोखंडेच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज, म्हणाली `मी खूप आनंदी...`
Ankita Lokhande नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रेग्नंसीच्या चर्चांवर वक्तव्य केलं आहे.
Ankita Lokhande is Pregnant Actress Opens About News : अभिनेत्री अंकिता लोखंडेनं (Ankita Lokhande) छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत स्वत: ची जागा निर्माण केली. अंकिता ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अंकिता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. यावेळी अंकिता चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे G5 वर प्रदर्शित झालेल्या तिची शॉर्ट फिल्म. त्यासोबत अंकिता तिच्या प्रेग्नंसी न्यूजमुळे देखील चर्चेत आहे. दरम्यान, त्यावर अंकितानं आता प्रतिक्रिया दिली आहे. (Ankita Lokhande Husband Vicky Jain)
अंकिता 14 डिसेंबर 2021 रोजी विक्की जैनसोबत लग्न बंधनात अडकली होती. तेव्हा पासून मध्ये मध्ये तिच्या लग्नाती चर्चा ही सुरुच आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अंकितानं तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांवर वक्तव्य केलं आहे.
याबातमीवर अंकिता म्हणाली की, "याआधी फक्त लग्न, नंतर प्रेग्नन्सी आणि त्यानंतर घटस्फोटाच्या बातम्या येत होत्या, पण मला काही फरक पडत नाही. लोक यावर चर्चा करतील, पण जोपर्यंत ते चांगल्या गोष्टींवर चर्चा करत आहेत तो पर्यंत सर्व काही ठीक आहे. जेव्हा ती अशा काही बोलतात ज्यानं त्रास होतो आणि त्याचा माझ्यावर परिणाम देखील होतो."
हेही वाचा : Alia नंतर Swara Bhaskar लग्नाआधीच प्रेग्नंट? बेबी बंप व्हिडिओचा धुमाकूळ
पुढे अंकिता म्हणाली, "ते माझ्या प्रेग्नंसीविषयी बोलत आहेत मी आनंदी आहे. कारण मी एक दिवस नक्कीच प्रेग्नंट असेल आणि मी लोकांना ही गोड बातमी गर्वानं सांगेन."
पुढे अंकिता म्हणाली, तिच्या करिअरमध्ये पती विकी जैननं तिची खूप साथ दिली आहे. 'विकी जैन हा खूप समजूतदार नवरा आहे आणि सगळ्यात आधी तो माझा चांगला मित्र आहे. मला माझं काम आवडतं हे त्याला माहीत आहे. आम्ही कामाबद्दल चर्चा करतो आणि त्याला माझी आवड-निवड समजते. मी माझ्या भूमिकेविषयी त्याच्याशी चर्चा करते. मला त्यांना सगळं सांगायला आवडतं. त्याला माझ्या अभिनयावर आणि प्रतिभेवर खूप विश्वास आहे.