मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडेने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय तिने 'बागी 3' आणि 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. अंकिता कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आता देखील अंकिताचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री  बाथटबमध्ये बोल्डपोज देताना दिसत आहे. सध्या सर्वत्र तिच्या फोटोंची चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाथटबमधील फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'Born with good jeans' असं लिहिलं आहे. सध्या सर्वांच्या नजरा अंकिताच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंवर येऊन थांबल्या आहेत. पाहा अंकिताचा कधीही न पाहिलेला हॉट आणि बोल्ड अंदाज...



अंकिताबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 'पवित्र रिश्ता' मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. शिवाय अंकिताने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे.


सध्या अंकिता तिच्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. अंकिताने बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्न केलं आहे. लग्नानंतर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.