सुशांत प्रकरणात अंकिता लोखंडेने रियाला विचारला थेट प्रश्न?
ड्रग्स प्रकरणावर विचारला प्रश्न
मुंबई : सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखडे त्याच्या कुटुंबासोबत उभी आहे. सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी ती त्याच्या कुटुंबासोबतच राहणार आहे. पण यादरम्यान अंकितावर देखील अनेक आरोप लावण्यात आले. तिच्या वागण्यावर देखील प्रश्नचिन्ह उभे राहिले. यावर आता अंकिताने पुढे येऊन स्पष्टीकरण दिलं आहे.
अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अंकिताने रिया चक्रवर्तीवर निशाणा साधला आहे. अंकिताने या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,'मी कधीच म्हटलं नाही की हा मर्डर आहे आणि याकरता कुणी जबाबदार आहे. मी तर फक्त कायम सुशांतकरता न्याय मागितला आहे. त्याच्या कुटुंबियांसोबत उभी राहिली आहे. मी तर फक्त हाच विचार केला की, जे सत्य आहे ते समोर यावं.'
अंकिता तिच्या या पोस्टमध्ये तिला मारलेल्या टोमण्यांचा देखील समावेश केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, अंकिताला विधवा ते सवतपर्यंत बोलले गेले आहे. मात्र ती या अगोदर कधीच रिऍक्ट झाली नाही.
तिच्या म्हणण्यानुसार, सुशांतच्या प्रकरणात यासाठी ऍक्टिव झाली होती कारण तिच्या त्याच्या मानसिक आरोग्याबाबत माहिती होती. अंकिता सुशांतसोबत २०१६ पर्यंत होती. त्याच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण तिला आठवायचा होता.