मुंबई : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या निधनानंतर अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सतत न्यायाची मागणी करत होती. सुशांतच्या निधनानंतर अंकिता सतत त्याच्याशी संबंधित फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. शनिवारी सुशांतची एक्स गर्लफ्रेंड असलेल्या अंकिताने एक व्हिडिओ शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओतून तिने सुशांतला आदरांजली वाहिली आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओत सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. व्हिडिओत अंकिता लोखंडे डान्सची प्रॅक्टिस करताना दिसत आहे. 



बॅकग्राऊंडमध्ये नेहा कक्कड आणि जुबीन नोटियालच्या गाण्यावर 'तारों के शहर में' डान्स करत आहे. व्हिडिओ शेअर करताना अंकिता लोखंडेने म्हटलंय की,'यावेळी परफॉर्म करणं थोडं वेगळं आहे. माझ्याकडून तुला खूप प्रेम... हे खूप त्रासदायक आहे. सोबतच अंकिताने सुशांत सिंह राजपूत, पवित्र रिश्ता म्हणतं हॅशटॅगचा वापर केला आहे.