65 व्या वर्षी इंटीमेट सीन, प्रियांका चोप्रासोबत वाद ते दोन वेळा लग्न..., असे आहे Annu Kapoor यांचे आयुष्य
अभिनेत्याचं फक्त करिअर नाही तर त्याचं खासगी आयुष्य देखील चर्चेचा विषय ठरले होते. या अभिनेत्यानं वयाच्या 65 व्या वर्षी इंटिमेट सीन दिला होता.
Annu kapoor Birthday : अभिनेता अन्नू कपूर (Annu kapoor) यांनी आतापर्यंत अनेक शो होस्ट केले आहेत. त्यांना खरी ओळख ही 'अंताक्षरी' या शोला होस्ट केली तेव्हा मिळाली. अन्नू यांनी 1983 साली प्रदर्शित झालेल्या मंडी या चित्रपटातून त्यांच्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्यांना 'उत्सव' या बॉलिवूड चित्रपटातून ओळखू लागले. त्यांना या चित्रपटासाठी फिल्मफेयर अवॉर्ड फॉर बेस्ट परफॉरमेंस इन अ कॉमिक रोल हा पुरस्कार मिळाला होता. आज अन्नू हे त्यांचा 67 वा वाढदिवस साजरा करत आहे. चला जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही रंजक गोष्टी... (Annu kapoor 65th Birthday)
65 व्या वर्षी दिलेले बोल्ड सीन
अन्नू कपूर यांनी आपल्या करिअरमध्ये अल्ट बालाजीच्या ‘पौरुषपूर’ नावाच्या सीरिजमध्ये खूप बोल्ड सीन दिले होते. त्यांनी यावेळी त्यांच्यापेक्षा अनेक वर्षांनी लहान असलेल्या महिला कलाकारांसोबत इंटिमेट सीन शूट केले होते. यानंतर अन्नू हे एक गंभीर अभिनेते आहेत असा प्रेक्षकांचा दृष्टीकोनही बदलला होता. खरंतर वयाच्या 65 व्या वर्षी अन्नू कपूर यांनी दिलेल्या बोल्ड सीन पाहून अनेकांना धक्का बसला होता. Annu kapoor Bold Scene With Actress at 65 age
प्रियांका चोप्राशी वाद
‘सात खून माफ’ या चित्रपटात अन्नू कपूर यांनी प्रियांका चोप्राच्या सात पतींपैकी एकाची भूमिका साकारली होती. पण या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान असं काही घडलं की या सगळ्याचं रुपांतर वादात झालं होतं. प्रियांका चोप्रानं अन्नू यांच्यासोबत इंटिमेट सीन देण्यास नकार दिला होता. मी दिसायला चांगला नाही किंवा मग मी हीरो नाही, या कारणामुळे प्रियांकानं इंटिमेट सीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर बराच काळ दोघांमध्ये वाद रंगला होता.
अन्नू कपूर यांनी दोन वेळा केलं लग्न
अन्नू कपूर यांचे वैवाहिक आयुष्य तर नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांची पत्नी अनुपमा अमेरिकन आहे. त्यांनी 1992 मध्ये लग्न केलं होतं, पण वर्षभरातच त्यांच्यात वाद होऊ लागले होते. त्याकाळात अन्नू यांच्या आयुष्यात अरुणिता यांची एंट्री झाली. त्यानंतर अन्नू यांनी अनुपमा यांना घटस्फोट दिला. घटस्फोट होताच अन्नू यांनी अरुणिता यांच्याशी लग्न केलं. अन्नू आणि अरुणिता यांनी एक मुलगी देखील आहे.
हेही वाचा : 'Swara Bhaskar आणि फहाद अहमदला AMU मध्ये येऊ देणार नाही...', विद्यार्थी नेत्यानं दिली धमकी
हे सगळं इथेचं थांबलं नाही तर त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा पहिल्या पत्नीवर प्रेम झालं आणि ते तिला लपून भेटू लागले. अन्नू नक्की कुठे जातात आणि काय करतात असा संशय अरुणिता यांना आला आणि एकदिवस सत्य त्यांच्यासमोर आले. त्यानंतर मात्र, अरुणिता यांनी अन्नू कपूर यांच्यासोबत विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे 2005 साली अन्नू यांनी दुसऱ्यांदा घटस्फोट घेतला. अरुणितापासून घटस्फोट झाल्यानंतर अन्नू यांनी 2008 मध्ये पहिली पत्नी अनुपमाशी पुन्हा लग्न केले