मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्या सिनेमांमध्ये दिलेल्या बोल्ड सीनमुळे चर्चेत आल्या. इंटिमेट सीन दिल्यामुळे अभिनेत्रींना टीकेचा सामना देखील करावा लागला. पण एका सिनेमात अभिनेत्री प्रियंका चोप्राने इंटिमेट सीन न दिल्यामुळे अभिनेता नाराज झाला. एवढंच नाही तर, अभिनेत्याने नाराजी देखील व्यक्त केली. अभिनेत्याने केलेल्या वक्तव्यामुळे प्रियंका तुफान चर्चेत देखील आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियंकावर नाराजी व्यक्त करणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अन्नू कपूर आहेत. 2011 मध्ये अभिनेता अन्नू कपू यांनी केलेल्या टिप्पणीमुळे अभिनेत्री प्रियंका चर्चेत आली होती. प्रियंका आणि अन्नू यांनी 'ऐतराझ' आणि 'सात खून माफ' सिनेमात काम केलं. 



'सात खून माफ' सिनेमात अन्नू यांनी प्रियंकाच्या एका पतीची भूमिका साकारली. सिनेमात इरफान खान, नसिरुद्दीन शाह, जॉन अब्राहम, नील नितीन मुकेश अशी स्टारकास्ट आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान अन्नू कपूर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.


काय म्हणाला अन्नू कपूर?
सिनेमात प्रियंकाने अन्नूसोबत इंटिमेट सीन करण्यास नकार दिला. तेव्हा अन्नू म्हणाले, 'प्रियंकाचा दिसायला चांगले नसणाऱ्या किंवा अभिनेते नसणाऱ्यांसोबत इंटिमेट सीन करण्यास नकार आहे. पण तिला हिरोंसोबत इंटिमेंट सीन करायला काही अडचण नाही..'


अन्नूच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रियंका सडेतोड उत्तर देत म्हणाली, 'इंटिमेट सीन करायचे असतील आणि घाणेरड्या कमेंट करायच्या असतील तर अशा सिनेमांमध्ये काम करावं...'


प्रियंकाने सडेतोड उत्तर दिल्यानंतर अन्नू यांनी अभिनेत्रीला 'या सगळ्या गोष्टी फार गांभीर्याने नकोस...'असा सल्ला दिला. प्रियंकाबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे.