शबाना आजमी यांच्याशी लग्न करायला तयार नव्हते जावेद अख्तर; मध्य रात्री मित्रानं शोधून आणला मौलवी
Shabana Azmi and Javed Akhtar : शबाना आजमी आणि जावेद अख्तर यांच्या लग्नाच्या आधल्या दिवशी काय झालं याविषयी त्यांच्यात मित्रानं खुलासा केला आहे.
Shabana Azmi and Javed Akhtar : बॉलिवूडचे लोकप्रिय लेखक जावेद अख्तर आणि शबाना आजमी यांची जोडी नेहमीच ही आजही प्रेक्षकांमध्ये चर्चेत असते. या दोघांची जोडी ही लोकप्रिय कपल्सपैकी एक आहे. त्या दोघांची लव्ह स्टोरी देखील तितकीच चर्चेत होती. त्याचं कारण म्हणजे जावेद अख्तर हे विवाहीत होते आणि इतकंच नाही तर त्यांना दोन मुलं होती तरी त्यांनी शबाना आजमी यांच्याशी लग्न केलं. दरम्यान, आता त्यांचे जवळचे मित्र आणि दिग्गज अभिनेता अन्नू कपूर यांनी त्यांच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर आणि शबाना आजमी यांच्या लग्नाची गोष्ट सांगितली आहे.
अन्नू कपूर यांनी 'एएनआय'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की ते जावेद अख्तर आणि शबाना आजमी यांच्या लग्नाच्या तयारीत सहभागी होते. त्याशिवाय त्यांनी सांगितलं की लग्नाच्या अगदी काही क्षण आधीच ते नशेत बेदुंध होते. त्याशिवाय त्यांनी हे देखील सांगितलं की "शबाना आजमी आणि जावेद अख्तर यांचं नातं काही प्रमाणात गुंतागुंतीचं होतं. त्याचं कारण म्हणजे जावेद अख्तर हे हनी ईरानी यांच्यासोबत विवाहीत होते. अन्नू कपूर यांनी पुढे जावेद अख्तर आणि शबाना आजमी यांच्या लग्नाच्या रात्रीविषयी खुलासा करत सांगितलं की 'जावेद त्या रात्री नशेत होते. शबाना दुसऱ्या ठिकाणी बसून पुस्तक वाचत होती."
जावेद अख्तर पुढे म्हणाले, 'मी तिथेच होतो आणि मी शबानाला म्हणालो बीबी एकदा यावर काय तो सोक्षमोक्ष लाव, हे ऐकूण जावेद अख्तर यांना आश्चर्य झालं.' तेव्हा ते म्हणाले की "त्यांनी इतकी दारू प्यायली आहे की ते कोणत्या ही प्रकारचा निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नाही. तर जेव्हा मी जावेद अख्तरकडे गेलो आणि त्याला झोपेतून उठवलं तेव्हा तो म्हणाला की 'हो मी तयार आहे.' त्यानंतर मी त्याच्यासोबत वांद्रेच्या मस्जिदमध्ये गेलो आणि मौलवीला शोधू लागलो. आम्ही एका मौलवीला शोधलं आणि घरी घेऊन आलो."
हेही वाचा : 'या' ठिकाणी होणार सलमान खानच्या 'सिकंदर' चं शूट; भाईजानचं आहे खास कनेक्शन
पुढे अन्नू मलिक यांनी सांगितलं की "जेव्हा ते मौलवीला शोधायला गेले होते त्याच दरम्यान, शौकत अम्मीनं शबाना आजमीचा लग्नात घालणारा ड्रेस हा वरच काढून ठेवला होता आणि त्यांनी त्यांचे मित्र अनिल कपूर आणि बोनी कपूर यांना फोन करून बोलावून घेतलं होतं. अनिल कपूर, बोनी कपूर आणि अन्नू कपूर यांच्या उपस्थितीत जावेद अख्तर आणि शबाना आजमी यांचं लग्न झालं. ही बातमी कळाल्यानंतर जावेद अख्तर यांची पत्नी आणि दोन्ही मुलं बराच काळ त्यांच्यावर चिडले होते."