Annu Kapoor Hamare Baarah Movie : बॉलिवूड अभिनेता अन्नू कपूर यांचा ‘हमारे बारह’ हा चित्रपट कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. आता त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची पुढे ढकलण्यात आली आहे. या चित्रपटाची प्रदर्शनाची तारिख ही 7 जून रोजी प्रदर्शित होणार होता. पण बॉम्बे हायकोर्टानं 14 जून पर्यंत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे. खरंतर पुण्यात राहणाऱ्या एका व्यक्तीनं पिटीशन दाखल केली होती, ज्यानंतर बॉम्बे हाय कोर्टानं दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर 'हमारे बारह' च्या प्रदर्शनाची तारिख 14 जून पर्यंत थांबवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणात सेंट्रल ब्युरो ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) नं कोर्टाला सांगितलं की ते चित्रपटाला प्रमाणपत्र जारी करतात आणि यूट्यूबवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरवर त्यांचे कोणतेही नियंत्रण नाही. याचिकेत असं म्हटलं आहे की चित्रपट निर्मात्यांनी यूट्यूबवर प्रदर्शित केलेल्या दोन ट्रेलरवर आक्षेप घेत त्यांच्या भावना दुखावल्या असल्याचे म्हटले आहे.


सीबीएफसीच्या वतीनं अद्वैत सेठना यांनी सांगितलं की आठ सदस्यीय समितीने चित्रपटाचे अनेक स्तरांवर परीक्षण केलं. समितीनं काही दुरुस्त्या सुचविल्या होत्या, ज्यांचे पालन करण्यात आले आहे. सेठना म्हणाले की बदलांनंतरच चित्रपटाला U/A प्रमाणपत्र देण्यात आलं. चित्रपटातील काही संवादांवर आक्षेप घेण्याबाबत न्यायालयाच्या प्रश्नावर अद्वैत म्हणाले की, चित्रपट निर्मात्यांनी ते संवाद आता काढून टाकले आहेत. त्यावर न्यायालयानं विचारलं की जर सीबीएफसीने संवाद काढून टाकले आहेत, तर याचिकाकर्त्यानं ते कसे पाहिले? हे डायलॉग काढून टाकलेत असं तुम्ही कशाच्या आधारावर म्हणताय? यावर अद्वैत म्हणाले की, इंटरनेटवर रिलीज होणाऱ्या ट्रेलरवर सीबीएफसंचे कोणतेही नियंत्रण नाही. तिकिट बुकिंग ॲपवर रिलीज झालेल्या त्यानंतरच्या ट्रेलरमध्ये ते संवाद नव्हते.


याचिकेवर सुनावणी केल्यानंतर न्यायालयानं चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख एका आठवड्यासाठी पुढे ढकलली आहे आणि सीबीएफसीनं त्यांचा जवाब नोंदवण्यास सांगितलं आहे. न्यायालयानं याचिकेवर सुनावणी करण्यासाठी 10 जून ही तारिख ठरवली आहे. निर्मात्यांनी आणि क्रूनं 24 मे रोजी वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत अज्ञात व्यक्तींकडून जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळत आहेत.