मुंबई : कलाकार कधीच आपली कला लपवू शकत नाही, आणि कोणत्याच कलाकाराची आतली कला मारली जात नाही. कितीही दशकं झाली तरी ती कला, सृजनशीलता उलट अधिक प्रभावी होत जाते. 


व्हिडीओ यूट्यूबवर व्हायरल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐंशी-नव्वदच्या दशकातील गाणी गाणारा एक अवलियाचा व्हिडीओ यूट्यूबवर व्हायरल होत आहे. अनेकांना या व्हिडीओची खिल्ली उडवली आहे, या उलट काहींनी या व्यक्तीचं कौतुक केलं आहे. कारण त्यांना येणारी गाणी, आजही ते पूर्ण मनाने गातात, आणि मनातल्या मनात ही बॉलीवूडची गाणी अजरामर ठेवतात. 


असे किती गुणी कलाकार असतील?



या अवलियाचं नाव काय आहे, हे माहित नाही. पण या सारखे अनेक कलाकार सोशल मीडियाचा काळ नसल्याने त्यावेळी दबले गेले असतील हे नक्की, उशीरा का होईना, अशा लोकांचे कलागुण लोकांसमोर येत आहे, ही खूप सुखावणारी बाब आहे.


हे गाणं नेमक्या कोणत्या सिनेमातलं?



याद तेरी आयेगी, मुझको बडा सताएगी, हे गाणं राजीव कपूर यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे.  'एक जान है हम' या सिनेमातील हे गाणं आहे. हा सिनेमा १९८३ साली रिलीज झाला होता. चित्रपटात शब्बीर कुमार आणि आशा भोसले यांनी हे गाणं गायलं आहे. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक अन्नू कपूर होते.