VIDEO: अंशुमन विचारेनं विकत घेतलं नवं घर; चाहत्यांना दाखवली पहिली झलक
Anshuman Vichare New Home: अभिनेता अंशुमन विचारे यानं नवीन घर विकत घेतलं आहे. यावेळी त्यानं आपल्या घराची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यामुळे सध्या त्याची बरीच चर्चा रंगलेली आहे. तुम्ही व्हिडीओ पाहिलात का?
Anshuman Vichare New Home: अभिनेता अशुंमन विचारेनं नवं घर खरेदी केलं आहे. ज्याची बातमी त्यानं आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून दिली आहे. त्यानं आपल्या ऑफिशियल अकांऊटवरून आपल्या नव्या घराच्या बांधकामाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी त्याच्या व्हिडीओखाली चाहते शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. मुंबईत आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचच स्वप्न असतं. अंशुमन विचारेनं आपलं गृहस्वप्न साकार केलं आहे.
त्यानं मुंबईत घर विकत घेतलं असून सध्या त्याच्या घराचं बांधकाम सुरू आहे. नुकतीच त्यानं आपल्या पत्नीसह इमारतीचे बांधकाम जिथे सुरू आहे. तिथे भेट दिली. तेव्हा त्यांनी आपल्या घराची पहिली झलक ही चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
यावेळी हा व्हिडीओ शेअर करत अंशुमनच्या पत्नीनं कॅप्शन दिलंय, ''नवं घर लवकरच... खूप खूप वाट पाहात आहोत''. 'दादा वहिनी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा' असं अनेक चाहत्यांनी म्हणत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक सेलिब्रेटींनीही या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. सोबतच हसबंड वाईफ, न्यू होम, हॅप्पी, लव, फॅमिली असे हॅशटॅग्सही दिले आहेत. 'फू बाई फू', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' अशा लोकप्रिय विनोदी मालिकांमधून तसेच 'पोश्टर बॉईज', 'धिंगाणा', 'संघर्ष' 'माझ्या नवऱ्याचा प्रियकर', 'श्वास' अशा लोकप्रिय मराठी चित्रपटांतून कामं केली आहेत. त्यानं रंगभूमीवरही अनेक लोकप्रिय नाटकातून अभिनय केला आहे.
हेही वाचा : '...अन् अमिताभ बच्चन यांनी मिठी मारली', उपेंद्र लिमये यांनी सांगितला 'तो' Larger Than Life किस्सा
यावर्षी अनेक मराठी सेलिब्रेटींनीही आपल्या घराचे स्वप्न पुर्ण केले आहे. प्रसाद खांडेकर, मयुरी वाघ, पृथ्वीक प्रताप, अक्षय केळकर, स्मिता शेवाळे, धनश्री काडगावकर अशा कलाकारांनी या वर्षी आपलं गृहस्वप्न पुर्ण केलं आहे.