Anupam Kher Head Tattoo : बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अनुपम यांनी नुकताच त्यांचा एक नवा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. इतकंच नाही तर त्यांना हा लूक Bald लोकांना डेडिकेटही केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्यावर गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. खरंतर अनुपम खेर यांनी अशा ठिकाणी टॅट्यू काढला आहे ज्यानं सगळ्यांना आश्चर्य झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुपम खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अनुपम खेर यांनी या व्हिडीओत डोक्यावर टॅट्यू काढल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत अनुपम खेर यांनी मजेशीर कॅप्शनही दिले आहे. अनुपम हा व्हिडीओ शेअर करत म्हणाले माझी ही पोस्ट जगातल्या त्या सगळ्या लोकांसाठी आहे ज्यांच्या डोक्यावर केस नाहीत. केस असलेल्या सगळ्यांना गर्व आहे की ते त्यांच्या केसांसोबत खूप काही करू शकतात. पण ते असं काही करू शकतात? बिल्कुल नाही. पण अनुपम खेर यांनी त्यांच्या डोक्यावर काढलेला हा टॅट्यू खरा नाही आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, अनुपम खेर यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर मजेशीर कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, मी कुठेतरी वाचलं होतं की ज्यांना बुद्धी नसते त्यांना देव त्याकडे कोणाचं लक्ष जायला नको म्हणून केसं देतात. तर बुद्धी असलेल्या लोकांचे केस काढून घेतात कारण तुम्हाला त्याची गरज नाही. दुसरा नेटकरी म्हणाला, तुम्ही सुपरस्टार आहात, तुम्ही काहीही करू शकता. तिसरा नेटकरी म्हणाला, खूप सुंदर सर. आणखी एक नेटकरी म्हणाला, सर तुम्ही काहीही केलंत तरी सुंदर दिसतात. दुसरा नेटकरी म्हणाला, तुम्ही तर खरचं आग लावली सर. 


हेही वाचा : Vijay Sethupati नं फक्त 'या' कारणासाठी दिला शाहरुख खानच्या 'जवान'ला होकार


अनुपम खेर यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यांVijay Sethupati नं फक्त 'या' कारणासाठी दिला शाहरुख खानच्या 'जवान'ला होकारनी 'द काश्मिर फाइल्स' या चित्रपटात काम केलं होतं. त्यांच्या कामानं सगळ्यांना आश्चर्य झाले, नेहमीच प्रमाणे त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. लवकरच अनुपम खेर हे बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतच्या 'इमरजेंसी' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय त्यांच्याजवळ 'मेट्रो इन दिनों' आणि 'द वैक्सीन वॉर' हे चित्रपटही आहेत.