नवी दिल्ली : अनुपम खेर यांनी बुधवारी अचानक एफटीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. त्यांच्या राजीनाम्यानंतर अनेक चर्चा रंगू लागल्या, तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले. या चर्चा थांबण्यासाठी अनुपम यांनी एक ट्वीट केलंय. या ट्वीटमधून साऱ्या प्रश्नांना उत्तर मिळाली नाहीत पण काहीवेळापुर्वी त्यांनी 'झी न्यूज' शी संवाद साधला.


अमेरिकन वेबसिरिजमध्ये...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मी आता लंडन विमानतळावर असून आपल्या व्यस्त वेळापत्रकामुळे राजीनामा दिलाय', असे अनुपम म्हणाले. अमेरिकन वेब सिरिजमुळे अनुपम खेर यांनी एफटीआय च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे म्हटलं जातंय.


तुम्हाला अजून विश्वास बसत नसेल तर नेटवर जाऊन अमेरिकन वेब सिरिज 'न्यू एम्स्टर्डम शो'ची तारीख पाहू शकता. एप्रिल पर्यंत ते अमेरिकेत शूट करत आहेत. एप्रिलमध्ये अमेरिकेतून परतल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरे देणार असल्याचे त्यांनी 'झी न्यूज' ला सांगितलं.


अनुपम खेर यांच्या फिल्‍म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्‍टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा अनेकांसाठी आश्चर्यकारक होता. आता या पदावर कुणाची नियुक्ती होणार? असाही प्रश्न अनेकांना पडलाय.


यासंबंधी एफटीआयआयचे माजी अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनी झी न्यूजशी संवाद साधताना, अनुपम खेर किती व्यस्त असतात हे सर्वांनाच माहिती आहे. हे पद ग्रहण करण्यापूर्वी त्यांनी थोडा विचार करायला हवा होता, अशी प्रतिक्रिया दिलीय. 


एफटीआयआयचं अध्यक्षपद खूपच महत्त्वपूर्ण आहे. त्याला खूप वेळ खर्च करावा लागतो... तिथला मॅनेजमेंट गव्हर्निंग स्टाफ, स्टुडंट काऊन्सिल आणि विद्यार्थ्यांना तत्पर राहावं लागतं. परंतु, अनुपम खेर मात्र आपल्या १ वर्ष २० दिवसांच्या कार्यकाळात फार वेळ देऊ शकले नाहीत, असं गजेंद्र चौहान यांनी म्हटलंय. 


मंगळवारी फिल्म डिव्हिजनच्या ऑफिसमध्ये आयोजित एका मिटिंगमध्ये अनेक सदस्य उपस्थित होते... इथं अनुपम खेरही उपस्थित होते.. परंतु, तिथं कुणाला भनकही लागली नाही की दुसऱ्या दिवशी ते आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत, असंही गजेंद्र चौहान यांनी स्पष्ट केलंय. 


हे पद रिकामं झाल्यानंतर आता पुन्हा एकदा चौहान यांनी संधी मिळाली तर ती स्वीकारणार का? या प्रश्नावर 'पत्नी आणि मुलीसोबत जर संधी मिळाली तर आपण देशसेवेसाठी तयार आहोत' असं चौहान यांनी म्हटलंय. 


'अतिशय मानाच्या अशा एफटीआयआयचं अध्यक्षपद भूषवणं ही माझ्यासाठी अतिशय मानाची बाब आणि एक सुवर्णसंधीच होती. ज्या संधीतून खूप काही शिकता आलं. पण, माझ्या काहा आंतरराष्ट्रीय कामांमुळे मी यापुढे या शिक्षणसंस्थेला पुरेसा वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळेच मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आपला आभारी...'  असं सांगत अनुपम खेर यांनी एफटीआयआय (Film and Television Institute of India) म्हणजेच एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांनी सोपवला.


गजेंद्र चौहान यांच्या वादग्रस्त कारकिर्दीनंतर खेर यांनी ११ ऑक्टोबर, २०१७ मध्ये अनुपम खेर यांनी या संस्थेच्या अध्यपदाचा अधिभार सांभाळला होता.