मुंबई : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांना वीरमरण आल्यामुळे देश शोकसागरात बुडाला आहे. संपूर्ण देशात हल्ल्याचा मास्टरमाइंड आदिल अहमद दारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत पाकिस्तानचा विरोध करण्यात आला सोबतच साऱ्या देशभरातून सीआरपीएफच्या जवानांना आदरांजलीही वाहण्यात आली. नवजोत सिंग सिद्धूने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा जेष्ठ अभिनेता अनुपम खेर यांनी तीव्र शब्दात विरोध केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुपम खेर यांनी स्वतःच्या ट्विटर अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे, पोस्टमध्ये त्यांनी 'माणुस जेव्हा जास्त बोलतो तेव्हा तो काहीतरी वायफळ बोलतो' असे म्हंटले आहे.



 


सिद्धूंनी केलेल्या वक्तव्यामुळे जनसामान्यांमध्ये तिव्र आक्रोश बघायला मिळत आहे. सिद्धूंना 'द कपिल शर्मा शो'मधून बाहेर काढण्याच्या मागणीनंतर 'द कपिल शर्मा शो'ची टीम, सोनी टीव्ही टीम एकत्रितपणे यावर चर्चा करत होते. अतिशय संवेदनशील घटनेवर नवज्योत सिंग सिद्धूंनी दिलेले हे विधान चुकीचे असल्याचे टीमच्या सदस्यांनी आणि कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी यावर एकत्रितपणे निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार त्यांच्यासोबत पुढील एपिसोडचे शूट करण्यात येणार नसल्याची माहिती मिळत आहे. सिद्धूंना बाहेर काढल्यानंतर आता त्यांच्या जागी अर्चनापूरन सिंग यांची वर्णी लागली आहे.