Anupama Serial Kissing Scene Between Anuj and Anupama : छोट्या पडद्यावरील 'अनुपमा' (Anupama) ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारानं अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेतील अनुज (Anuj) आणि अनुपमाची (Anupama) केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सध्या मालिकेत अनुजला खुश करण्यासाठी अनुपमा प्रयत्न करताना दिसते. मात्र, अनुजचा राग शांत होत नाही. आता अनुपमानं अनुजसाठी रोमॅंटिक डेट प्लॅन केली असून त्यांच्या नात्याची सुरुवात नव्यानं करण्याचा प्रयत्न करते. दरम्यान, अनुजला खूश करत नात्याची नव्यानं सुरुवात करण्यात अनुपमा यशस्वी झाल्याचे चित्र दिसत आहे. सोशल मीडियावर त्यांचे अनेक रोमॅंटिक फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांनी हा अंदाज लावल्याचे समोर आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसापासून अनुपमा आणि अनुजमध्ये सतत वाद सुरु होते. त्यामुळे अनुजला प्रचंड दु: ख झाले. अनुजनं चा सगळ्यांसमोर अपमान झाल्यामुळे तो अनुपमावर रागावला होता. सोशल मीडियावर अनुपमा आणि अनुजचे हे रोमॅंटिक फोटो व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. हे फोटो पाहून अनुपमा आणि अनुजच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. त्या दोघांच्या चाहत्यांनी त्यांचे रोमँटिक सीनचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अनुजनं अनुपमासाठी डिनर डेट प्लॅन केलेली असते.  यावेळीच ते दोघे रोमॅंटिक झाले होते. इतकंच काय तर ते पहिल्यांदा एकमेकांच्या जवळ आले होते. यावेळी त्या दोघांनी किस केलं. हे पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला. या दोघांच्या केमिस्ट्रीनं सगळेच रेकॉर्ड तोडले आहेत. (Anupama Serial Bold Scene Viral)



यावेळी अनुपमानं पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, व्वा, हा एपिसोड पाहण्यासाठी मी प्रतिक्षा करू शकत नाही. दुसरा नेटकरी म्हणाला, मला अनुज आणि अनुपमाला कधीपासून एकत्र पाहायचे होते. तिसरा नेटकरी म्हणाला, आता अनुपमाची टीआरपी नक्कीच वाढणार. (Anupama Serial Huge Fan Following)


हेही वाचा : सीट बेल्ड लावला नाही म्हणून Saif -Kareena ट्रोलर्सच्या निशाण्यावर, म्हणाले 'मुंबई पोलिस...'


दरम्यान, 'अनुपमा' या मालिकेचे सोशल मीडियावर जबरदस्त फॅनफॉलोइंग आहे. प्रेक्षक या मालिकेचा एकही एपिसोड मीस करत नाही. अनुपमा या शोचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाल्यापासून रसिकांच्या आवडती मालिका ठरली आहे. या मालिकेत अनुपमा ही भूमिका रुपाली गांगुली (Rupali Ganguli) साकारत आहे आणि गौरव खन्ना (Gaurav Khanna) अनुजची भूमिका साकारत आहे.