इंटीमेट सीन्समुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली अभिनेत्री
अशा पद्धतीने अभिनय क्षेत्राकडे वळली अनुप्रिया
मुंबई : अगदी कमी वेळातच अभिनेत्री अनुप्रिया गोयनकाने आपल्या अभिनयाने सगळ्यांना प्रभावित केलं आहे. आज ही अभिनेत्री एक लोकप्रिय चेहरा आहे. अनुप्रियाने आपल्या करिअरच्या सुरूवातीला अनेक सीरिजमध्ये काम केलं आहे. यामुळेच ती सर्वाधिक वेळा ओळखली जाते. आज अभिनेत्री अनुप्रिया यांचा 34 वा वाढदिवस आहे. जाणून घेऊया तिच्या प्रोफेशन लाइफबद्दल....
अभिनेत्री अनुप्रियाचा जन्म 29 मे 1987 रोजी उत्तर प्रदेशातील कानपुरमध्ये झाला. दिल्ली युनिर्व्हसिटीमध्ये तिने कॉमर्सची बॅचलरची डिग्री घेतली. अभिनयाची तिला आवड होती मात्र कुटुंबियांची अडचण दूर करण्यासाठी तिने हे क्षेत्र निवडलं. त्यावेळी अनुप्रियाने जिद्दीने या क्षेत्रात पदार्पण केलं. तसेच वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत केली.
मात्र कालांतराने तिच्या लक्षात आलं की, या दोन्ही गोष्टी एकत्र होणं शक्य नाही. यावेळी तिने अभिनयाची निवड केली. 2013 मध्ये साऊथच्या Potugadu या सिनेमातून करिअरला सुरूवात केली. यानंतर बॉबी जासूस, पाठशाला, डॅडी, टायगर जिंदा है आणि वॉर सारख्या सिनेमात काम केलं आहे. यासोबतच ओटीटी सिनेमातही काम केलं आहे. तसेच सेक्रेड गेम्स, द फाइनल कॉल, अभय, क्रिमिनल जस्टिस, आश्रम, असुर आणि पांचाली सारख्या वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. यातील पांचालीमुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली.
पांचोली या वेब सीरीजमधून अनुप्रियावर आरोप करण्यात आले आहे. अभिनेत्री म्हणून तिने आपली जबाबदारी पूर्ण केलेली नाही. अनुप्रियाला याबाबत कळल्यावर तिने आपल मत अतिशय ठामपणे मांडलं आहे. त्यावरून तिने मिसलीड केल्याचा आरोप केला. अनुप्रिया म्हणाली की, पांचाली ही 45 मिनिटांची वेबसीरिज असेल असं वाटलं होतं. मात्र ती चक्क वेब सीरिज निघाली. ही वेब सीरिज करताना इंटीमेट सीन 30 सेकंदाच असेल तसेच यामध्ये डिम लाइटचा वापर केला जाईल. मात्र यामध्ये 3 ते 4 मिनिटांकरता हे सीन करण्यात आहे. तसेच डिम लाइटच्या ऐवजी उजेडात शूट करण्यात आलं.