125 किलो ते 70 किलो वजनाचा प्रवास; 25 वर्षाच्या तरुणाने असा केला Weight Loss

वजन वाढणे ही मोठी समस्या होत चालली आहे. तरुण वयात वजन वाढीच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशावेळी 25 वर्षाच्या तरुणाने दर महिन्याला 5 किलो वजन केले कमी. 

| Jul 05, 2024, 16:50 PM IST

लठ्ठपणा हा दिवसेंदिवस वाढत जाणारी समस्या आहे. एकदा तुम्ही या चक्रात अडकलात की वजन कमी करणे कठीण होऊन जाते. लठ्ठपणामुळे अनेक आजार होतात. डायबिटिस, हाय ब्लड प्रेशर, थायरॉइड, कॅन्सर यासारखे आजार होतात. अशावेळी वेळीच वजन कंट्रोलमध्ये ठेवणे गरजेचे आहे. 25 वर्षाच्या तारकचं वजन 125 किलोच्या जवळपास पोहोचले होते. पण त्याने हार मानली नाही. वजन कमी करण्याचा प्रवास सुरु कला. वेट लॉसचा हा प्रवास प्रत्येकालाच थक्क करणारा आहे. 

1/7

प्रेरणादायी प्रवास

वजन कमी करण्याचा प्रवास हा प्रत्येकासाठी प्रेरणादायी असतो. तारकचा हा 11 महिन्यांचा प्रवास हा त्याच्यासह प्रत्येकासाठीच प्रेरणादायी असेल यात शंका नाही. 

2/7

क्रेविंग कसं कमी कराल?

वजन कमी करण्याच्या प्रवासादरम्यान त्याला अनेक गोष्टी खाव्याशा वाटतात. ज्यामुळे वजन वाढते. या गोष्टी वजन कमी होऊ देत नाहीत, त्यामुळे तुमची भूक किंवा लालसेवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात चिया बिया आणि दही यांचे मिश्रण घेतले पाहिजे. हे असे मिश्रण आहे ज्यामध्ये प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात.

3/7

गाठलं होतं 125 किलो वजन

तारक या तरुणाचे वयाच्या 25 व्या वर्षी 125 किलो वजन झाले होते. यामुळे त्याला त्रास होत होता. असह्य झालेलं वजन कमी करण्यासाठी तारकने आपल्या वेट लॉसचा प्रवास सुरु केला. या मुलाने 11 महिन्यात तब्बल 60 किलो वजन कमी केलं. दर महिन्याला 5 किलो वजन केलं कमी. 

4/7

वर्कआऊट प्लान

वजन कमी करण्यासाठी तारकने डाएटसोबतच एक्सरसाइजला देखील तितकंच महत्त्व दिलं. कार्डियो, वेट ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग यासारख्या गोष्टींचा सहभाग आपल्या रुटिनमध्ये केला. फॅट बर्न करण्यासाठी एक्सरसाइजने खूप मदत केली. स्विमिंगचा पर्याय देखील त्याला मदत करणारा ठरला.

5/7

वेटलॉस डाएट प्लान

ब्रेकफास्ट  सकाळी 7 ते 8 - प्रोटीन 30 ग्रॅम 4 अंडे  20 ग्रॅम कार्बोहायड्रेटकरिता 2 मल्टीग्रेन ब्रेड  1 चपाती  लंच  दुपारी 1 ते 2 यावेळेत  प्रोटीन 3 ग्रॅम, कार्ब्स 80 ग्रॅम आणि फॅट 11 ग्रॅम, तांदूळ 50 ग्रॅम चावल, 3 वाटी डाळ, सॅलड अर्धा कप आणि 200 ग्रॅम दही  डिनर  प्री-वर्कआऊट मील (1 तास आधी), प्रथिने 14 ग्रॅम, कार्ब्स- 40 ग्रॅम आणि फॅट- 15 ग्रॅम, टोन्ड दूध- 250 ग्रॅम, एक केळी आणि 15 ग्रॅम पीनट बटर.

6/7

या गोष्टी ठरवून टाळल्या

साखर, साखरयुक्त पदार्थ तारकने पूर्णपणे टाळले. साखर वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरते. तसेच सोडा, पेप्सी, चिप्स, बिस्कीट, मैद्याचे पदार्थ, चॉकलेट आणि आइस्क्रिम यासारखे पदार्थ बंद करतात. 

7/7

प्रथिने किती महत्त्वाचे

वजन कमी करण्यासाठी आणि सुदृढ शरीर मिळविण्यासाठी प्रथिने अत्यंत आवश्यक आहेत. तारकने सांगितले की, प्रथिनेयुक्त पदार्थ खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत झाली. यासाठी त्याने डाएटमध्ये चणे, ओट्स, नट बटर, क्विनोआ, मसूर, अंडी, ब्रोकोली, फेटा आणि नट्स मिक्स अशा गोष्टी खाण्याचा सल्ला दिला आहे.