Amruta Subhash : बॉलिवूड अभिनेत्री अमृता सुभाष ही सध्या 'लस्‍ट स्‍टोरीज 2' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अमृतानं आजवर अनेक चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिचा अभिनय तर प्रत्येकवेळी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो असं म्हणायला हरकत नाही. अमृतानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कॅमेऱ्यावर इंटिमेट सीन्सचं शूटिंग करण्यावर वक्तव्य केलं आहे. यावेळी अमृतानं सांगितलं की महिला आणि पुरुष दिग्दर्शक यांच्यात असे सीन्स शूट करण्यात काही फरक आहे की नाही. यावेळी अमृतानं बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप सोबत तिचा पहिला सेक्स सीन शूट करण्याविषयी सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुराग कश्यप सोबत चित्रपटातील पहिला इंटिमेट सीन शूट करतानाचा अनुभव सांगत अमृता म्हणाली, ‘सेक्रेड गेम्स 2' या सीरिजचे शूटिंग करताना मला दिग्दर्शकाच्या टीमने माझ्या मासिक पाळीच्या तारखा विचारल्या, पाळीच्या वेळी महिलांना त्रास होतो, सहज शूट करता यावे यासाठी त्यांनी मला याविषयी विचारले होते. यात पुरुष किंवा महिला असण्याचा कोणताच प्रश्न नाही. ते खूप चांगले आहेत. ‘सेक्रेड गेम्स 2' या सीरिजसाठी मी माझ्या पहिल्या इंटिमेट सीनचे शूट केले. या सीरिजचे दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केले. त्यांनी हे सीन पूर्णपणे माझ्या सोयीनुसार शूट करण्याचा प्रयत्न केला. मी अस्वस्थ होऊ नये याची काळजी त्यांच्या टीमकडून घेण्यात आली. त्यांनी मला आधीच मासिक पाळीच्या तारखा विचारून घेतल्या होत्या आणि त्या तारखेच्या आसपास सेक्स सीनचे शूटिंग करणार नाही असे मला सांगितले होते. मला ही गोष्ट प्रचंड आवडली अनुराग कश्यप यांची संपूर्ण टीम फारच चांगली आहे. त्यांनी विचारले की तुम्ही हे तुमच्या मासिक पाळीच्या काळात कराल?"



अमृता याविषयी सांगताना पुढे म्हणाली, सेन्सेटिव्ह असण्याला कोणत्याही लिंगाला धरून बोलायला नको आणि हे पुरुष आणि महिला होण्या पलिकडे आहे. ते खूप चांगले आहेत. अमृता सुभाषने ‘सेक्रेड गेम्स 2’ मध्ये रॉ एजंटची भूमिका साकारली होती. ‘सेक्रेड गेम्स’ च्या दोन्ही भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. 'सेक्रेड गेम्स' मध्ये नवाजुद्दिन सिद्दिकी, गणेश गायतोंडे आणि सैफ अली खान यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. 


हेही वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा दुसरा सीझन लवकरच येणार? Shreyas Talpade च्या व्हिडीओवरून एकच चर्चा


'लस्‍ट स्‍टोरीज 2' विषयी बोलायचे झाले. तर या चित्रपटात अमृता सुभाषसोबत काजोल, नीना गुप्ता, कुमुद मिश्री, अंगद बेदी मृणाल ठाकूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.