मुंबई : सिनेमा दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यपचा 10 सप्टेंबर रोजी 46 वा वाढदिवस. अनुरागचा लहानपणी विज्ञानाकडे अधिक कल होता. शास्त्रज्ञ होण्याची इच्छा मनाशी बाळगणाऱ्या अनुरागने मित्राच्या सल्याने थिएटर जॉईन केलं. जिथून अनुराग आंतरराष्ट्रीय मंचावर पोहोचला. आज अनुरागचा वाढदिवस त्याच्या आयुष्यातील काही खास पानं आज आपण उलगडणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशच्या गोरखपुरमध्ये 10 सप्टेंबर 1972 मध्ये अनुरागचा जन्म झाला. अनुरागचे वडिल इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे चीफ इंजिनिअर होते. त्यांच्या बदलीमुळे अनुराग वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठा झाला. देहरादूनच्या ग्रीन स्कूल आणि ग्वालियरच्या सिंधिया स्कूलमध्ये अनुरागचं शिक्षण झालं. त्यानंतर त्याने दिल्लीच्या हंसराज कॉलेजमध्ये झूओलॉजीमध्ये पदवी घेतली. 


मुलींमुळे शिक्षणाकडे झालं दुर्लक्ष 


अनुराग कश्यपने एका मुलाखतीत सांगितलं की, कॉलेजमधील मुलींमुळे माझं शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं. मुलींना आकर्षित करण्यासाठी अनुराग सतत हेअर स्टाईल बदलत असे. रंगीबेरंगी कपडे घालत असे. कोणत्याही ब्रँडचे सेकंड हँड बूट खरेदी करण्यासाठी जुगाड करत असे. 


इंग्लिश बोलायला येत नसे 


'देव डी' सिनेमाचा दिग्दर्शक अनुराग सांगतो की, त्याला इंग्रजी बोलता येत नसे. यामुळेच सिंधिया शाळेत तो आपल्या क्लासमेट्सपासून लांब पळत असे. त्यांनी अधिक काळ ही लायब्ररीत हिंदी पुस्तक वाचण्यात घालवली. मात्र कॉलेजमध्ये इंग्रजीची अडचण झाली तेव्हा इंग्रजी पुस्तकं वाचायला सुरूवात केली. 


मित्राने थिएटर करण्याचा सल्ला दिला


दिल्लीतील ' जन नाट्य मंच'मधील मित्र सुनील सिन्हाने अनुरागला थिएटरमध्ये अभिनय करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याला स्ट्रीट प्ले करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर लोकप्रिय हबीब तनीवरच्या समुहाशी अनुराग कश्यप जोडला गेला.