लग्नाअगोदर सेक्स केलं तर? अनुराग कश्यपला मुलीचा सवाल
अनुरागच्या प्रश्नाची सगळीकडे चर्चा
मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपने नुकताच आपल्या यूट्यूब अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. आलियाने यावेळी वडिल अनुरागला अने मुदद्यांवर प्रश्न विचारले आहेत. तिच्या या प्रश्नांच्या सरबत्तीमध्ये तिने एक अनुरागला विचारलंय की,'लग्नाच्या अगोदर सेक्स केलं तर तुमची काय रिऍक्शन असेल?' यावर अनुरागने दिलेलं उत्तर महत्वाचं आहे.
आलिया जेव्हा लग्नाच्या अगोदर सेक्स करण्याबाबत प्रश्न विचारलं तेव्हा अनुराग म्हणाला हा कोणता प्रश्न आहे? हा प्रश्न तर आपण 80 च्या दशकात विचारत असू? आता आपल्याला या प्रश्नाच्या पुढे जायला हवं.
जेव्हा आपण कॉलेजमध्ये होतो तेव्हा हा प्रश्न विचारत असू. आपण दुसऱ्यांना उपदेश देण्याचा प्रयत्न करतोय. आलिया अनुरागसोबत म्हणाला की, आता लग्नाच्या अगोदर सेक्स ही गोष्ट अतिशय नॉर्मल आहे. आता या प्रश्नांची गरज नाही. वेळ खूप पुढे निघून गेली आहे.
आलियाचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयर सध्या मुंबईत आहे. अशावेळी शेनवर पण एक प्रश्न विचारण्यात आला. आलियाने अनुरागला विचारलं की,'शेनबद्दल तुम्ही काय विचार करता?' यावर अनुराग म्हणतो की,'मला शेन पसंत आहे. मला तुझ्या मित्रांची आवड आणि खास करून मुलांची निवड आवडते. शेन खूप सुंदर आहे. तो खूप आध्यात्मिक आहे. तसेच तो शांत देखील आहे. त्याच्यामध्ये अशी क्वालिटी आहे जी 40 वर्षांच्या मुलांमध्ये देखील नसते. जर आपण वेगवेगळ्या सिच्युएशनबद्दल बोलायचं झालं तर. '
यासोबतच आलियाने अनुरागला आपलं मुलांसोबत फिरण आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणं याबाबत विचारलं.' आलिया आणि अनुरागचा हा संवाद अतिशय चर्चेत राहिला. आलिया ही अनुरागच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे.