खिशामध्ये 6 हजार रुपये घेवुन मुंबईमध्ये आला होता अनुराग कश्यप, रस्त्यावर घालवल्या कित्येक रात्री
अनुराग कश्यपने दिग्दर्शक म्हणून `पंच` हा चित्रपट बनविला होता, जो आजपर्यंत प्रदर्शित होवू शकला नाही.
मुंबई : अनुराग कश्यप आउट ऑफ द बॉक्स म्हणून ओळखला जातो. त्याचे चित्रपट विशिष्ट वर्गामध्ये खूप हिट होतात. त्याच्या चित्रपटांमुळे अनुरागला कधीकधी टीका आणि विरोधाचा सामना करावा लागतो. सेन्सॉर त्याच्या सिनेमांच्या बर्याच सीन्स कट करायला मागेपुढे पाहत नाही.अनुराग मुंबईला आला तेव्हा त्याच्या खिशात 5 ते 6 हजार रुपये होते. तो मुंबई शहरात पहिल्या 8-9 महिने खूप अस्वस्थ होता. यावेळी त्याला रस्त्यावरही झोपावं लागले आणि कामाच्या शोधात भटकत रहावं लागलं. त्यानंतर त्याला पृथ्वी थिएटरमध्ये काम मिळालं. पण त्यांच पहिलं नाटक आजपर्यंत पूर्ण होऊ शकलं नाही, कारण त्याचवेळी दिग्दर्शकाचा मृत्यू झाला होता.
आउट-ऑफ-द बॉक्स
अनुरागने दिग्दर्शक म्हणून 'पंच' हा चित्रपट बनविला होता, जो आजपर्यंत प्रदर्शित होवू शकला नाही. २०१२ मध्ये आलेल्या 'गँग्स ऑफ वासेपुर' या चित्रपटातून अनुरागला ओळख मिळाली. ऑफबीट बॉलिवूड चित्रपटाच्या दिग्दर्शकानं आतापर्यंत 'गुलाल', बॉम्बे टॉकीज, 'कुरुप', 'रमण राघव २.०' सारखे अनेक हिट चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत.
प्रथम चित्रपट संपादकाशी लग्न केले
अनुरागचं सिनेमा एडिटर आरती बजाजशी २०१३मध्ये लग्न केलं, त्यानंतर २००९ मध्ये सहा वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला. या जोडप्याला एक मुलगीही आहे, तिचं नाव आलिया कश्यप असून ती 18 वर्षांची आहे.
11 वर्षांनी लहान असलेल्या कल्कीसोबत दुसरं लग्न
उंटी मधील 'देव डी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शक अनुराग कश्यपची भेट कल्की कोचेलिनसोबत झाली. आणि तेव्हापासूनच एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनीही लग्नगाठ बांधली. त्यांचंही नातं फार काळ टिकलं नाही आणि दोघांनी 2015 मध्ये घटस्फोट घेतला.
21 वर्षांच्या मुलीला करत होता डेट
अनुराग 21 वर्षांच्या लहान मुलगी शुभ्रा शेट्टीला डेट करत आहे. शुभ्रा आणि अनुराग हे गेल्या कित्येक महिन्यांपासून लिव्ह-इनमध्ये राहत आहेत. शुभ्राने झेविअर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आहे. कॉलेज संपल्यानंतर शुभ्राने "फॅंटम फिल्म्स"मध्ये प्रवेश केला. अनुरागने 24 वर्षीय शुभ्राबरोबर आपले फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.…