नवी दिल्ली : फिल्ममेकर अनुराग कश्यपचा ‘मुक्काबाज’ हा सिनेमा १२ जानेवारीला रिलीज होणार आहे. या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदील दाखवला आहे. 


हे मिळालं प्रमाणपत्र


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुराग कश्यप याच्या या बहुचर्चीत सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने  यू/ए प्रमाणपत्र दिलं आहे. या प्रमाणपत्रावर अनुराग चांगलाच खुश आहे. अनुरागच्या या सिनेमात विनीत कुमार सिंह, आणि जोया हुसैन मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमाची कथा उत्तर प्रदेशातील बरेलीची आहे. या सिनेमात एका लव्हस्टोरीसोबतच खूपकाही असल्याचं अनुरागने सांगितलं आहे. 


अनुरागने ट्विट करून दिली माहिती


अनुरागने ट्विट करत माहिती दिली की, ‘अनिश्चितता आणि शंकेच्या काळात सीबीएफसीसोबत ख-या, तर्कसंगत आणि सशक्त करणा-या अनुभवाबद्दल आभारी आहे. बोर्डाने मला हा सिनेमा करण्यामागणी मनिषा विचारली होती. आणि मी मोकळेपणाने आणि निर्भिडपणे आपलं म्हणनं मांडलं. गेल्यावेळी असं ‘गॅंग्स ऑफ वासेपुर’च्या निमित्ताने झालं होतं. अनुरागने यासाठी सीबीएफसी चीफ प्रसून जोशी आणि माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांचे आभारही मानले. 




आणखी काय आहे सिनेमात?


सिनेमा अजून रिलीज झालेला नाहीये. पण केवळ ट्रेलरवरून हा सिनेमा चांगला असणार अशा प्रतिक्रिया येत आहेत. ट्रेलरला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे. सिनेमात एका प्रेमकथेला धरून उत्तर प्रदेशातील खेळाच्या मक्तेदारीवर भाष्य करण्यात आलं आहे. खेळाच्या राजकारणात अभिनेता विनीत गुंतला जातो. विनीत यात एका पहेलवानाची भूमिका साकारत आहे. त्याचं एका ब्राम्हण मुलीवर प्रेम असतं. पण मुलीच्या काकाला हे मान्य नसतं. त्यामुळे तो विनीतला बर्बाद करण्याचा निश्चय करतो. मुलीच्या काकाची भूमिका जिमी शेरगील याने साकारली आहे.