VIDEO : सोशल मीडियावर वायरल झालेली `प्रिये...` अनुरागच्या सिनेमात
अनुराग कश्यप दिग्दर्शित `मुक्केबाज` लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. या सिनेमातलं एक गाणं नुकतंच लॉन्च करण्यात आलंय.
मुंबई : अनुराग कश्यप दिग्दर्शित 'मुक्केबाज' लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. या सिनेमातलं एक गाणं नुकतंच लॉन्च करण्यात आलंय.
हे गाणं खास ठरतंय... कारण या गाण्याचे बोल कुठेतरी ऐकलेले किंवा पाहिलेले आहेत, असं सगळ्याच नेटिझन्सना वाटतंय... आणि हो ते खरंही आहे...
गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर 'प्रिये' हा हॅशटॅगनं धुमाकूळ घातला होता. एका कवितेपासून हा हॅशटॅग सुरू झाला आणि जो तो हाच हॅशटॅग वापरून आपल्या चारोळ्या मांडू लागला... हीच कविता अनुरागनं आपल्या सिनेमात गाणं म्हणून वापरलीय.
'मुश्किल है अपना मेल प्रिये' ही कविता उत्तर भारतात खूपच लोकप्रिय कविता आहे. अनेक प्रेम कहाण्या जात, धर्म, श्रीमंत-गरिब अशा अंतरावर येऊन थांबतात... त्या प्रेयसी-प्रियकराच्या भावना या कवितेत व्यक्त केल्या गेल्यात. ही कविता डॉ. सुनील जोगी यांनी लिहिलीय.
आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, या गाण्यात नवाजुद्दीन सिद्दीकीही दिसतोय. या सिनेमात नवाजुद्दीन नसला तरी या गाण्यासाठी त्याचा ढिनचॅक स्पेशल अपिअरन्स आकर्षक ठरलाय.