बॉलिवूड दिग्दर्शक-अभिनेता अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) आपण मुंबई सोडण्याच्या तयारीत असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीमधील असंतोष यामागे कारणीभूत असल्याचंही त्याने सांगितलं आहे. The Hollywood Reporter India ला दिलेल्या मुलाखतीत अनुराग कश्यपने आपल्या निर्णयामागील कारणांचा उलगडा केला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या सुरु असलेले प्रकार आणि विचासरणी यामुळे घुटमळणारे वातावरण निर्माण झाले आहे असा संताप अनुराग कश्यपने व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी आता मुंबई सोडून बाहेर स्थायिक होत आहे असं अनुराग कश्यपने ठामपणे सांगितलं. तसंच चित्रपट तयार करण्यासाठी वाढलेला खर्च आणि क्रिएटिव्हिटीच्या तुलनेच नफ्यावर जास्त लक्ष दिलं जात असल्याने आपली नाराजी जाहीर केली. "माझ्यासाठी आता प्रयोग करणं फार कठीण झालं आहे , कार त्यासाठी किंमत मोजावी लागते. माझे निर्माते आता नफ्याचा विचार करतात. चित्रपटाच्या पहिल्या दिवसापासून तो कसा विकायचा याचा विचार सुरु होतो. यामुळे चित्रपटाची निर्मिती करतानाचा आनंद बाजूला राहतो," अशी नाराजी अनुराग कश्यपने जाहीर केली आहे. 


अनुराग कश्पयने यावेळी दक्षिणेत स्थलांतरित होण्याचा आपला हेतू बोलून दाखवला. तिथे त्याच्या क्रिएटिव्हीला जास्त वाव मिळेल अशी आशा त्याने व्यक्त केली आहे. “मला जिथे चालना मिळेल तिथे जायचे आहे. नाहीतर मी असाच म्हातारा होऊन मरेन. मी माझ्या स्वतःच्या इंडस्ट्रीमुळे खूप निराश आणि वैतागलो आहे,” असं तो म्हणाला आहे. 


टॅलेंट मॅनेजमेंट कंपन्यांवर ताशेरे


कश्यपने टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सींवर कठोर शब्दांत टीका केली आहे. फायद्यासाठी तरुण अभिनेत्यांचे शोषण केल्याचा आणि प्रतिभेच्या तुलनेत स्टारडमला प्राधान्य दिल्याचा आरोप केला. "कोणालाही अभिनय करायचा नाही. त्यांना सर्वांना स्टार करायचं आहे. एजन्सी कोणालाही स्टार बनवणार नाही, परंतु ज्या क्षणी कोणी स्टार बनते, एजन्सी त्यांच्याकडून पैसे कमवते. ते त्यांचा ब्रेनवॉश करतील आणि त्यांना स्टार बनण्यासाठी काय करावे लागेल ते सांगतील. ते त्यांना वर्कशॉपमध्ये पाठवणार नाहीत तर जिममध्ये पाठवतील. हे सर्व ग्लॅम-ग्लॅम आहे कारण ते मोठे स्टार असले पाहिजेत," असं अनुराग कश्यपने स्पष्ट केलं.


अनुराग कश्यपने यावेळी एक किस्साही सांगितला, जेव्हा एका अभिनेत्याने एजन्सीच्या सांगण्यावरुन त्यांच्यापासून अंतर राखलं होतं. पण जेव्हा एजन्सीने त्याला एकट्याला सोडलं तेव्हा तो मार्गदर्शन घेण्यासाठी परत आला होता अशी आठवण त्याने सांगितलं. "एजन्सी हेच करत करतं, फक्त तुमच्यापासून पैसे कमावतं. ते करिअर तयार करण्यावर गुंतवणूक करत नाहीत," असं तो म्हणाला.


अनुराग कश्यपने पुढे ज्या कलाकारांना तो मित्र मानायचा त्यांच्याबद्दलची निराशा उघड केली. “माझे अभिनेते, ज्यांना मी मित्र समजत होतो, ते फक्त तुमचा वापर ककरतात कारण त्यांना एक विशिष्ट मार्ग बनवायचा आहे. ते इथे फार घडतं. मल्याळम सिनेमात असं होत नाही,” असं त्याने नमूद केलं.