मुंबई : अभिनेत्री पायल घोषनं लैंगिक शौषणाच्या आरोप केल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपला आता चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. पायलनं २२ सप्टेंबरला यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. मुंबई पोलिसांनी अनुरागला समन्स देत आज चौकशीसाठी बोलावलं आहे. तर दुसरीकडे पायल घोषला मेडीकल रिपोर्टसाठी विलेपार्लेच्या कूपर रुग्णालयात नेण्यात आल. काल संध्याकाळी पायल मेडीकल टेस्टसाठी कूपरमध्ये गेली होती. पण टेस्ट झाली नव्हती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लैंगिक शोषण आरोप प्रकऱणी निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यपची वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान अनुराग कश्यपनं त्याच्यावरील आरोप फेटाळले आहेत. पायल घोषला आपण प्रोफेशनली ओळखतो. गेल्या कित्येक दिवसांपासून पायल घोषला मी भेटलो सुद्धा नाही. असं अनुरागचं म्हणणंये. त्याचसोबत वर्सोवा इथल्या फ्लॅटमध्ये माझी पायल सोबत कुठलीही भेट झाली नाही असंही त्याचं म्हणणंये. आपल्यावरील आरोप खोटे असून, मला अडकवण्याचा कट रचला जात आहे असं अनुराग कश्यपचं म्हणणंय.


सुत्रांनी दिेलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांकडून अनुराग कश्यपसाठी प्रश्नांची यादी बनवण्यात आली आहे. यातील मुख्य प्रश्न अनुरागला विचारले जाऊ शकतात


पूर्ण नाव
वय
पत्ता
या पत्त्यावर किती वर्षांपासून राहताय ?
परिवारासोबत की वेगळे ?
तुमचा व्यवसाय ?
किती वर्षांपासून सिने दिग्दर्शक आहात ?
तुम्ही यारी रोड वर्सोवाला राहायचात का ? हो तर किती, कोणतं वर्षे ?
पायल घोषला कसं ओळखता ?
तुमची भेट कधी आणि कशी झाली होती ?
शेवटचं त्यांच्याशी कधी बोलला होतात ?
२०१३ मध्ये वर्सोवातील घरी तुमची भेट झाली होती ?
या भेटीदरम्यान काय झालं ?
लैंगिक शोषणाच्या आरोपावर स्पष्टीकरण द्यायचय ?
हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे काही पुरावे आहेत का ?


६ वर्षानंतर आरोप 


अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. यानंतर सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरु झालीय. अभिनेत्री कंगना राणौतने अनुरागच्या अटकेची मागणी केलीय. अनुराग कश्यपने माझ्यावर जबरदस्ती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती की त्यांनी यावर कारवाई करायला हवी. ज्यामुळे देशासमोर सत्य येईल. हे बोलणं माझ्यासाठी नुकसान देणार आहे. माझी सुरक्षा धोक्यात आहे. कृपया माझी मदत करा असं तिने म्हटलंय.  दरम्यान पायल घोष इतके दिवस गप्प का बसली ? असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय.



पायलचं स्पष्टीकरण 


मी अनेकदा यासंदर्भात ट्वीट केलं आणि डिलीट केलं. ट्वीट डिलीट कर असे माझ्या मॅनेजरने भावाला सांगितले. हे सारे माझे हितचिंतक आहेत. माझी फॅमिली संकुचित आहे. ती मला सपोर्ट करणार नाही. हे सर्व सोड आणि घरी चल असे ते म्हणतील. पण अनुरागने मला सॉरी म्हटलं असत तर बरं झालं असतं.


कोणाची हिम्मत होत नाही हे बोलण्याची. मला हे बोलायला ६ वर्ष लागली. बॉलीवुडमध्ये सर्वजण वाईट नसतात. सर्वजण ड्रग्ज घेतात असं नाही पण कोणीच ड्रग्ज घेत नाही असेही नाही.