बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शकांच्या यादीत अनुराग कश्यपचं नाव जोडलं जातं. कधी सिनेमा तर कधी व्यक्तिगत आयुष्यातील काही घटनांमुळे अनुराग कायमच चर्चेत असतो. सध्या अनुराग पुन्हा प्रकाशझोतात यायचं कारण म्हणजे त्याचा  मुलीसोबतचा पॉडकास्ट शो. सध्या या बाप लेकीचा पॉडकास्ट शो चांगलाच व्हायरल होत आहे.अनुरागची मुलगी आलिया लवकरच  विवाहबंधनात अडकणार आहे. लेकीचं  थाटामाटात लग्न करण्यासाठी अनुरागने केलेल्या खर्चाबद्दल सांगितलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका पॉडकास्ट शोमध्ये अनुराग म्हणत होता की, त्याच्या लेकीच्या लग्नासाठी त्याने बराच खर्च केला आहे. अनुराग पुढे म्हणतो की, आलियाच्या लग्नात झालेला खर्चात माझी एक लो बजेट सिनेमा होईल. लग्नात खूपच खर्च होणार असल्याने मला सिनेमावर खूप काम करण्याची गरज आहे. असा तो गमतीत म्हणाला होता. मी माझ्या लेकीचा बाप असण्यापेक्षाही तिचा खूप चांगला मित्र आहे. मला असं वाटतं की, पालकांनी आपल्या मुलांचे आई वडील असण्याबरोबरच मित्र असणं ही गरजेचं आहे. मी माझ्या मुलीचा बाप असण्यापेक्षाही जास्त मित्राच्या नात्याने तिच्याशी गप्पा मारतो. 


एका मित्राशी जसं सगळं बोलता येतं तितकचं तुमच्या मुलांनी तुमच्याशी मनमोकळं बोलायला हवं त्यामुळे मुलांसोबतच्या नात्यात दरी निर्माण होत नाही. मी माझ्या मुलीशी मित्रासारखं वागतो आणि मला माझ्या मुलीचा अभिमान वाटतो असं त्याने त्याच्या मुलीसोबतच्या नात्याबद्दल सांगितलं. त्यावेळी त्याची मुलगी तिथे उपस्थित होती. अनुरागच्या या बोलण्याने आलिया खूपच भावूक झाली. माझे वडील कायमच माझे खूप चांगले मित्र म्हणून राहणार आहेत असं ती म्हणाली. 


अनुरागने त्याची मुलगी आलियाला एकट्याने वाढवलं. आलिया ही अनुरागची पहिली पत्नी आरती बजाजची मुलगी आहे. मागच्याच वर्षी आलियाचा तिच्या प्रियकारासोबत साखपुडा पार पडला. आरती आणि अनुराग यांनी 2003 मध्ये लग्नगाठ बांधली होती मात्र काही कारणाने त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अभिनेत्री    कल्कि कोचलिनलोबत त्याने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली पण काही वर्षातच त्याचा दुसऱ्यांदा घटस्फोट झाला.