मुंबई : फिल्ममेकर अनुराग कश्यप यांच्या छातीत दुखल्यामुळे रूग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे. तात्काळ एंजिओप्लास्टी करण्यात आली आहे. (Anurag Kashyap undergoes angioplasty after chest pain, condition remains stable) डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या दिग्दर्शक अनुराग घरी आराम करत आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुराग यांना छातीत थोडं दुखत होतं. ज्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. एंजिओप्लास्टी केल्यानंतर लक्षात आलं की, त्यांच्यामध्ये काही ब्लॉकेज आहेत. ज्यानंतर सर्जरी करता तात्काळ दाखल करण्यात आलं आहे. अंधेरीच्या एका रूग्णालयात अनुराग यांच्यावर एंजिओप्लास्टी करण्यात आली. सर्जरी केल्यानंतर त्यांना एक आठवडा आराम करण्याचा सल्ला दिला आहे. 



अनुराग कश्यप यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अपकमिंग सिनेमा 'दोबारा'चं शुटिंग पूर्ण केलं आहे. दिग्दर्शकाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सिनेमा रॅप केलाचा फोटो शेअर केलाय. दोबारामध्ये तापसी पन्नू लीड रोलमध्ये आहे. तापसी आणि अनुराग यांचा एकत्र तिसरा सिनेमा आहे. 'सांड की आंख' आणि 'मनमर्जिया' हे दोन सिनेमे एकत्र केले आहेत. 



काही दिवसांपूर्वी अनुराग कश्यप यांच्या घरी आयटीचा छापा पडला होता. अनुरागसोबतच तापसीच्या घरी देखील रेड पडली होती. अनुराग आणि तापसी 'दोबारा' सिनेमाचं शुटिंग करत होते. कंगनाने या दरम्यान अनुराग आणि तापसी यांच्यावर ट्वट केलं होतं. याआधी देखील सोशल मीडियावर या तिघांमध्ये अनेकदा वाद झालेत.