`माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे` अनुषा दांडेकरची भूषण प्रधानसाठी खास पोस्ट
Anusha Dandekar and Bhushan Pradhan: अनुषाने भूषणसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Anusha Dandekar and Bhushan Pradhan: काही दिवसांपुर्वी महेश मांजरेकर यांचा जुनं फर्निचर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. सिनेमाच्या निमीत्ताने भूषण आणि अनुषा दांडेकर ही नवीकोरी जोडी या सिनेमाच्या निमीत्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आली. मुळची पुण्याची असलेली अनुषा मराठी चित्रपटांमध्येही झळकायला लागली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान भूषणने अनुषाला खूप मदत केली. अनुषाने भूषणसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अनुषाने इन्स्टाग्रामवर तिचे आणि भूषणचे काही फोटो शेअर केले आहेत. याचबरोबर कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''मी जास्त चित्रपट केले नाहीत. मी मुख्यतः सूत्रसंचालन करत होते. कोणत्याही कलाकाराचं सहकलाकार असणं ही एक वेगळी भावना असते, कारण तुम्हाला एक विशिष्ट पात्र साकारायचं असतं आणि त्यादरम्यान तुम्हाला नुकत्याच भेटलेल्या लोकांसोबत खूप वेळ घालवायचा असतो. हे अशा एका नात्याचे चक्र आहे, ज्यासाठी तुम्ही खरोखर तयार नसता.आज मला एका खास सहकलाकाराचे आभार मानायचे आहेत, ज्याने प्रत्येक पावलावर माझी मदत केलीय, मला धीर देलाय. प्रोफेशनल असूनही त्याने मला उत्तम काम करण्यासाठी नेहमीच वेळ दिला आहे. सेटवर बाकीच्यांइतकं आत्मविश्वासू नसणं हे खूप भीतीदायक असतं. पण, जेव्हा तुमच्याकडे अशी व्यक्ती असते जी तुम्हाला नेहमी प्रोत्साहन देत असते, तेव्हा तुम्ही कल्पनाही करू शकत नाही की तो सगळा प्रवास तुमच्यासाठी किती सोप्पा होऊन जातो.
अभिनेत्री पुढे म्हणाली, ''जेव्हा ते स्वत: उत्तम कलाकार असतात, पण ते तुम्हाला कधीच त्यांच्यापेक्षा कमी लेखत नाहीत; ही गोष्ट खरंच खूप मोठी असते आणि यासाठी धन्यवाद भूषण. माझा उत्तम सहकलाकार बनल्याबद्दल तुझे खूप आभार. भूषण तू मला खूप काही शिकवलंस. मी तुझी सदैव कृतज्ञ राहीन. शूटिंगदरम्यान मला शब्द उच्चारण्यात अडचण येत होती, तेव्हा मी माझे डायलॉग्स पुन्हा पुन्हा बोलत होते, त्यावेळी तू कधीच माझ्यावर हसला नाहीस. त्याऐवजी मी ते बरोबर करेन याची खात्री करण्यासाठी तू मला जास्त वेळ दिलास. या चित्रपटानंतरही जेव्हा तू दुसर्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होतास तेव्हा तू मला माझ्या प्रत्येक डायलॉगच्या व्हॉईस नोट्स पाठवल्यास, कारण मी माझं डबिंग उत्तमरित्या करू शकेन. तुला खूप सारे धन्यवाद, मला तुझ्याबरोबर काम करायला खूप आवडलं, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे!'' अश्या आशयाची पोस्ट अनुषाने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.