Anushka Sharma with Daughter : सध्या प्रत्येकजण कोरोना महामारीनंतर सर्व सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करत आहेत. फक्त सर्वसामान्यच नाही तर, सेलिब्रिटी देखील मोठ्या थाटात सण साजरे करताना दिसत आहे. सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू आहे. प्रत्येक सेलिब्रिटी चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहे. ऐकीकडे प्रत्येक जण मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करत आहे, पण अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka sharma) मात्र लेकीसोबत होळी (Anushka sharma HOLI) खेळताना दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री अनुष्का शर्माने इन्स्टाग्राम स्टोरीवर (Anushka sharma Social media) एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अनुष्का आणि लेक वामिका रंगांसोबत खेळताना दिसत आहे. अनुष्का शर्माने शेअर केलेला एक फोटो असा आहे की त्यात कोणाचाही चेहरा दिसत नाही, पण ते पाहून अंदाज बांधता येतो की ती वामिका आहे. (anushka sharma daughter vamika)


फोटोमध्ये जमिनीवर एक क्राफ्ट बोर्ड ठेवलेला दिसत आहे. क्राफ्ट बोर्ड भोवती खूप रंग पसरले आहेत. दरम्यान, फोटोमध्ये छोटे हातही दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अनुष्काने लिहिले की, 'दिवाळी आणि होळी एकाच दिवशी'. यासोबतच त्याने शॉकिंग चेहऱ्याचा इमोजीही शेअर केला आहे. सध्या अनुष्का आणि वामिकाचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (vamika and anushka at stadium)




 
विजय विराट कोहलीचा आणि उत्साह अनुष्का शर्माचा (virat kohli)
दिवाळीपूर्वी भारतीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान संघ यांच्यात टी-20 सामना झाला होता, ज्यामध्ये विराट कोहलीच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने सामना जिंकला. 


भारताच्या विजयावर अनुष्का शर्मा प्रचंड आनंदात होती. अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर करत विराटचे अभिनंदन केलं. दिवाळीच्या निमित्ताने देशाला एवढा आनंद दिल्याबद्दल अनुष्काने एका फोटोसह विराट कोहलीचे आभार मानले आहेत.