मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघे ११ डिसेंबरला इटलीत विवाहबद्ध झाले. तेव्हापासून ते सतत चर्चेत आहेत. त्यानंतर हनिमुनचे फोटोज आणि मग दिल्ली-मुंबईतील रिसेप्शनचे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. असे सगळे आनंदी वातावरण असतानाच अनुष्कासाठी अजून एक खास बातमी आली आहे.


काय आहे खास बातमी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ती म्हणजे तिला ‘पेटा पर्सन ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी २०१५ मध्ये तिला हॉटेस्ट वेजीटेरियन सेलिब्रिटी हा पुरस्कार देऊन पेटाने सन्मानित केले होते.


अनुष्काच्या कामाबद्दल थोडं...


अनुष्का प्राण्यांच्या समस्यांवर काम करते. सोशल मीडियावर ती त्याबद्दल जागरूकताही निर्माण करत असते. त्याचबरोबर अनुष्काचं वैशिष्ट म्हणजे ती शुद्ध शाकाहारी आहे. याबद्दल पेटाचे सेलिब्रिटी पब्लिक रिलेशन असोसिएट डायरेक्टर सचिन बांगेला यांनी म्हणाले की,  ‘पेटा सर्वांनाच शाकाहारी आणि पोषक आहार घेण्याचा सल्ला देत असते. तुम्ही कोणता आहार करता हे फार महत्त्वाचे असते. सुदृढ आरोग्यासाठी अधिकाधिक भाजीपाला खायला हवा. अनुष्का नेहमीच शाकाहारी आहार घेत असून, इतरांनाही शाकाहारासाठी प्रवृत्त करत असते.’